स्थैर्य, फलटण, दि १४: राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री व विधानपरिषद आमदार महादेव जानकर यांनी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांची भेट घेतली.
आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये एकत्रितपणे काम करता येईल का ? त्या वर सखोल चर्चा या वेळी झाल्याचे समजत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यानंतर फलटण तालुक्यात काँग्रेस फक्त नावाला राहिली होती. परंतु राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने संपूर्ण पदाधिकारी बदलून सचिन बेडके – सूर्यवंशी व महेंद्र बेडके – सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यात पुन्हा काँग्रेस बळकट करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आखणी केल्याचे दिसून येत आहे.
आगामी काळामध्ये होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष एकत्रित आल्यास फलटण तालुक्यामध्ये नक्कीच काँग्रेस व रासपा आहे आपली नव्याने जागा तयार करण्यामध्ये यशस्वी होतील, अशी चर्चा सध्या फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.