दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । फलटण । सासकल तालुका फलटण येथील तानाजी गणपत मुळीक यांची कन्या धनश्री व मौजे धुमाळवाडी येथील रे राजाराम भोसले यांचे चिरंजीव विराज यांचा शुभविवाह दि.२५ जुलै२०२२ रोजी फलटण गिरवी रोड वरील शांताई लॉन्स येथे संपन्न झाला.धनश्री ही राजे गटाचे रघुनाथ गणपत मुळीक यांची पुतणी असून दिनेश दत्तात्रय मुळीक यांची भगिनी आहे.म्हणून त्यांच्या आग्रहाखातर फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी या विवाह प्रसंगी उपस्थित राहून धनश्री व विराज यांना शुभ आशीर्वाद दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर परगावी असल्याने त्यांनी नवदांपत्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. यावेळी मुळीक व भोसले परिवाराच्या वतीने रघुनाथ गणपत मुळीक यांनी आमदार दीपकराव चव्हाण यांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सासकल गावचे माजी सरपंच हणमंत गंगाराम मुळीक, लक्ष्मण गणपत मुळीक, धनश्री चे चुलते विठ्ठल गणपत मुळीक, भाऊसो वामन मुळीक, सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी हरिबा मुळीक, विनायक मदने, बी.डी घोरपडे, विलास चांगण, सुरेश तुकाराम मुळीक, दिलिप नागू फडतरे, मानसिंग कुंभार, ज्ञानेश्वर नरसिंग मुळीक, मच्छिंद्र मुळीक व ग्रामस्थ उपस्थित होते.