पाडेगावमध्ये महापुरुष जयंती महोत्सवाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ


दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२४ | पाडेगाव | फलटण तालुक्यातील पाडेगाव येथे पाडेगाव सामाजिक विकास फौंडेशनच्या वतीने महापुरुष जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ आज महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी बाबासाहेब खरात, पाडेगावचे सरपंच राहुल कोकरे, बिपीन मोहिते, नितीन जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच अध्यक्ष शिरीष बनकर, प्रशांत ढावरे, दीपक सुतार, राजूनाना नेवसे, प्रभाकर नेवसे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महापुरुष जयंती महोत्सवामध्ये ग्रंथदिंडीसह आठवडाभर विविध मान्यवरांची व्याखाने संपन्न होणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!