‘लाडकी बहीण’ योजना फलटण तालुका समिती अध्यक्षपदी आमदार दीपक चव्हाण

सदस्यपदी सौ. उषा राऊत आणि नानासाहेब इवरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२४ | फलटण |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तालुका स्तरावर समित्या शासनाने जाहीर केल्या असून फलटण तालुका समितीच्या अध्यक्षपदी आमदार दीपक चव्हाण व सदस्यपदी सौ. उषा राऊत आणि नानासाहेब इवरे यांची निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सदस्यांची आज प्रांताधिकारी कार्यालयात पहिली बैठक पार पडली. यामध्ये नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. बैठक लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, बाल विकास अधिकारी प्रियांका गवळी यांची उपस्थिती होती.

बैठकीत लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ५०,००० अर्ज आत्तापर्यंत आल्याची माहिती देण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार दीपक चव्हाण, सौ. उषा राऊत, नानासाहेब इवरे यांचा यावेळी अधिकार्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!