मिथाली राज, नेहा धुपिया होणार एक्स्ट्रामार्क्सच्या पहिल्या अध्ययन महोत्सवात सहभागी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । मुंबई । एक्स्ट्रामार्क्स ही भारताची सर्वात विश्वसनीय एड-टेक कंपनी पहिल्यांदाच १५ व १६ जानेवारी २०२२ रोजी (दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत) दोन-दिवसीय अध्ययन व मनोरंजनपूर्ण महोत्सव ‘एक्स्ट्रामार्क्स वीकेण्डर’ आयोजित करण्यास सज्ज आहे. शिक्षणाचा आनंद देण्याचा मनसुबा असलेल्या या महोत्सवामध्ये अध्ययन व शिक्षणासाठी समर्पित विभाग, एक्स्ट्रामार्क्सचे समुह समुपदेशन सत्रे व लाइव्ह क्लासरूम, वर्कशॉप्स व चर्चासत्रे आणि अनेक इंटरअॅक्टिव्ह गेम्स, मनोरंजन व जीवनशैली उत्साहित करणारी बाजारपेठ यांचा समावेश असेल.

या महोत्सवाला अधिक खास करणारे कार्यक्रम आहेत, जे भारताच्या सर्वात प्रेरणादायी व्यक्तींना एकत्र आणतात. यामध्ये नेहा धुपिया, सोहा अली खान, ताहिरा कश्यप खुराणा व मिथाली राज अशा कलाकार, लेखक व क्रीडापट्टूंचा समावेश आहे. या सर्व पालकत्व, छंद जोपासणे, मुलांचे सक्षमीकरण, मानसिक आरोग्य अशा विषयांबाबत त्यांचे अनुभव सांगतील.

अभिनेत्री, मॉडेल व परोपकारी नेहा धुपिया म्हणाल्या, “मी मुले व त्यांच्या पालकांसाठी अगदी योग्य वेळी सादर करण्यात आलेला अत्यावश्यक उपक्रम एक्स्ट्रामार्क्स वीकेण्डरसाठी खूपच उत्‍सुक आहे. या कार्यक्रमाचा भाग होण्यासोबत मी काम व पालकत्व जीवनामध्ये कशाप्रकारे संतुलन राखते याबाबत सांगण्यासाठी एक्स्ट्रामार्क्स टीम माझ्याकडे आली तेव्हा मी त्वरित या संकल्पनेशी जुळून गेले. माझ्या मते, अनेक पालकांना अशा स्थितीचा सामना करावा लागतो. मी आशा करते की माझे मत व अनुभव त्यांच्या जीवनामध्ये, तसेच पालकत्वाच्या प्रवासामध्ये मूल्याची भर करेल.”

अभिनेत्री, चित्रपटनिर्माता व प्रभावक ताहिरा कश्यप खुराणा म्हणाल्या, “एक्स्ट्रामार्क्स वीकेण्डर अभूतपूर्व अध्ययन व धमाल संयोजनासह ‘एक्स्ट्रा’ स्पेशल अनुभव देण्याचे वचन देतो. तुम्ही मुलांना कशाप्रकारे सक्षम करता? त्यांना किती स्वातंत्र्य किंवा शक्ती द्यावी? त्यांना सक्षम करण्याचे योग्य वय कोणते? मी एक्स्ट्रामार्क्स वीकेण्डरमध्ये अशा इतर अनेक संबंधित प्रश्नांवर माझे मत सांगणार आहे. ‘शिकाऊ तरूण व विद्यार्थ्यांसाठी एक्स्ट्रामार्क्स भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार मिथाली राज यांचे मार्गदर्शन घेऊन येत आहे. त्या त्यांचे स्वप्न साकारण्याबाबतची जीवनगाथा सांगतील. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या एकदिवसीय व कसोटी सामन्‍यांच्या कर्णधार मिथाली राज म्हणाल्या, “मी अद्वितीय महोत्सव एक्स्ट्रामार्क्स वीकेण्डरचा भाग होण्यास खूपच उत्सुक आहे, जेथे अध्ययन व धमाल एकत्र येतात. मी अनेक तरूणांना, तसेच पालकांना प्रेरित करण्याची आशा करते. मी माझ्या होमटाऊनपासून जागतिक क्रिकेट क्षेत्रापर्यंत येण्याचा माझा जीवनप्रवास सांगणार आहे.”


Back to top button
Don`t copy text!