शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीच्या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ मे २०२२ । सातारा । उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या महा ई-सेवा केंद्र, इंटरनेट कॅफे व मोटार ड्रायव्हिंग स्कूल इत्यादी संस्थांमध्ये अचानक भेटी देऊन शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीच्या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास अशा दोषी ठरणाऱ्या संस्थेवर संबंधित कायद्यातील व अर्जदारावर मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 19 (1) (इ) अन्वये कारवाई करण्यात येईल असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितले आहे.

परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी ऑनलाईन पध्दतीने जारी करण्याबाबतची प्रणाली दि. 14 जून 2021  पासून सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शासनाने सुरु केलेल्या शिकाऊ अनुज्ञप्ती व वाहन चालक अनुज्ञप्तीच्या चाचणीकरिता तात्काळ सेवा उपलब्ध केलेल्या धोरणाचा गैरफायदा सायबर कॅफे घेत असून तशी जाहिरात प्रसिध्द करुन गैर व्यवहार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा जाहिरातीमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती काढण्यास आरटीओमध्ये जाण्याची  व टेस्टचीही गरज नसून फक्त फोटो व आधारकार्ड द्या आणि शिकाऊ अनुज्ञप्ती मिळावा अशा प्रकारच्या तक्रारी परिवहन कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.

केंद्रीय मोटार वाहन नियम 11 अन्वये शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा प्रमुखा उद्देश हा संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व याची माहिती व जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे वाहन चालकामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होणे, यासाठी संगणकीय वापर करतेवेळी पालकांनी त्यांच्या पाल्यास या परिक्षेचे महत्व पटवून देणे आवश्यक ठरते. तसेच या प्रणालीचा गैरवापर होणार नाही याची जाणीव देखील करुन देणे आवश्यक असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!