
दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । सातारा । शनिवार पेठ, सातारा येथे राहत असलेली विवाहिता बेपत्ता झाल्याने तिच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवाहिता ही कोणालाही काही न सांगता राहत्या घरातून निघून गेली. तिच्या पतीने शोध घेवून ती मिळून आली नाही. यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक घोडके करत आहेत.