
दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । सातारा । येथील विसावा नका परिसरातून एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैष्णवी किशोर घाटगे, वय १९, मूळ रा. बुध, ता. खटाव सध्या रा. विसावा नाका, सातारा, गजानन प्लाझा, बी विंग, फ्लॅट नंबर ४ ही युवती दि. २५ डिसेंबर रोजी ६ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली ती अद्याप परत न आल्याची तक्रार किशोर चंद्रकांत घाडगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.