महसूल खात्याचा भोंगळ कारभार…! खाबूगिरी रॅकेटचा जिल्हाधिकारी कधी करणार पर्दापाश?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सोलापूर, दि.१३:  उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ येथील शेतजमीन (गट नं. 163/1/अ/2/क क्षेत्र 3 हेक्टर) तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार या त्रिकुटाने विकास संभाजी तळभंडारे यांच्या सांगण्यावरून टेबलाखालून मालपाण्याची रसद मिळाल्याने एकाच जमीनीची तीन वेळा विक्री करून आणि बेकायदेशीर खरेदीखतावरून नोंदी धरल्याने महसूल खात्याचा अजब कारभार चव्हाट्यावर आल्याची माहिती सौ. सुरेखा आबासाहेब साबळे यांनी दैनिक कटूसत्य सी बोलताना दिली.
या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना साबळे म्हणाल्या की, होनसळ येथील  (गट नं. 163/1/अ/2/क क्षेत्र 3 हेक्टर) शेत जमीन विकास संभाजी तळभंडारे यांच्या कडून गुरुसिध्दय्या स्वामी आणि जगदेवी स्वामी यांनी खरेदी केली त्यानंतर तलाठी राजगुरू यांनी खरेदीची खात्री करून स्वामी दाम्पत्यांना सातबारा आणि फेरफार उतारे देऊन नोंद धरली. रितसर खरेदी दिल्याने या शेत जमिनीचा विकास तळभंडारे यांचा मालकीहक्क त्याच दिवशी संपला त्यानंतर ही शेतजमीन स्वामी कुटुंबाने सुरेखा आबासाहेब साबळे यांना रीतसर खरेदी दिली. त्यावरून या जमिनीचे सातबारा आणि फेरफार उतारा याच राजगुरु तलाठ्यांनी नोंद करून दिली. तेव्हापासून या शेत जमिनीचे मिळकतदार व वहिवाटदार सुरेखा आबासाहेब साबळे यांची झाली व आहे. वर्तमान पत्रात जाहीर नोटीस देऊन तलाठ्याच्या सही शिक्क्यावर विश्वास ठेवून ही जमीन त्यांच्याकडून साबळे यांनी विकत घेतली. त्यानंतर या शेतजमिनीवर तलाठ्याने सुरेखा साबळे यांची नोंद धरून सातबारा आणि फेरफार उतारे सुद्धा हातात दिले. “जे नसे ललाठी ते करील तलाठी” या म्हणीप्रमाणे महसूल खात्यामध्ये तलाठी या पदाला आजही मोठा मान आहे. यातलाठ्यावर विश्वास ठेवूनच प्रत्येक जण तलाठ्यांना मागणीप्रमाणे लक्ष्मी दर्शन देतात. या तलाठ्यांच्या सही शिक्क्यामुळे शेत जमिनीवर कब्जा मिळाला असे सर्वजण समजतात. परंतु आज सुद्धा तलाठी खाबुगिरी करण्यामध्ये आघाडीवर असल्याचे या प्रकरणावर उघड झालं आहे.
शेतकऱ्यांना त्वरित उतारे मिळावे म्हणून शासनाने ऑनलाइन उतारे देण्याची सोय केली. परंतु या धोरणामुळे शेतकऱ्यांची गैरसोय आणि तलाठ्यांच्या मालपाण्याची सोय झाल्याचे निदर्शनास आले. 2017 साली आपल्या शेत जमिनीचा सातबारा उतारा तलाठ्याकडे मागणी केला असता सौ. साबळे यांना तलाठ्याने ऑनलाइन उतारा घेण्यास सांगितले. आणि ऑनलाइन उताऱ्यावर चक्क दुसऱ्याच नाव लागल्याने महसूल खात्याचा हा भोंगळ कारभार उजेडात आला.
एकच शेतजमीन चार जणांना खरेदी देणारा विकास तळभंडारे आणि तलाठी, सर्कल यांच्या गैर कारभाराविरुद्ध साबळे यांनी तक्रार केली असून ही फसवणूक तळभंडारे यांच्या सांगण्यावरून तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बोगस नोंदी करून फसवणूक करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार या प्रकरणातील मोस्ट वाँटेड विकास तळभंडारे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. परंतु चार वर्षे न्याय न मिळाल्याने पोलिस आयुक्तांकडे न्याय मागितला त्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तळभंडारे याच्यावर दिनांक 3/ 12 /2020 रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तळभंडारे हा फरार असून न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकार्याचे उंबरे झिजवले अर्ज केले. परंतु न्याय मिळाला नाही सर्व अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गैरकारभार करणारे रॅकेट शोधून त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सुरेखा साबळे यांनी केली आहे.
विकास संभाजी तलभंडारे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली तीन महिने विकास तळभंडारे हा फरार झाला आहे. जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोपी तळभंडारेच्या वतीने अॅड. एस.एस.इनामदार तर सरकार वकील म्हणून अॅड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहीले तर फिर्यादीच्या बाजूनी अॅड उमेश भोजणे यांनी भक्कम किल्ला वाढविला.
त्याच्या विरोधात असे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. तळभंडारे याचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपीच्या वतीने

Back to top button
Don`t copy text!