अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट बनविण्यासाठी पालकांची संमती लागणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ जानेवारी २०२५ | नवी दिल्ली |
केंद्र सरकारच्या मसुद्यानुसार सोशल मीडिया कंपन्यांना वैयक्तिक डेटा भारताबाहेर नेण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल, तसेच १८ वर्षांखालील मुलांचे अकाऊंट तयार करण्यासाठी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. सोशल मीडियाच्या वापरासंबंधी केंद्र सरकारने नवा मसुदा तयार केला आहे.

सोशल मीडियाचा वापर अल्पवयीन मुलांमध्येही वाढल्यामुळे त्याचे दुष्पपरिणाम दिसून येत आहे. लहान मुले पालकांच्या नकळत सोशल मीडिया वापरत असल्यामुळे यातून अनेक गुन्हे घडल्याचे समोर आलेले आहे. यावर प्रतिबंध घालण्याची तयारी आता केंद्र सरकारने सुरू केली आहे. यापुढे १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट उघडत असताना पालकांची संमती घेणे अनिवार्य असणार आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अ‍ॅक्ट, २०२३ मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे.

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीने दिलेल्या सुचनेनुसार, सामान्य लोकही माय गव्ह डॉट इन या साईटवर जाऊन मसुद्यावरील आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवू शकतात. लोकांच्या सूचना आणि हरकतींवर १८ फेब्रुवारीपासून विचार केला जाईल. जवळपास दीड वर्षांपूर्वी या विधेयकाला संसदेची मंजूरी मिळाली होती. यातच पालकांच्या संमतीची तरतूद करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!