
दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला जाते, असे सांगून घरातून निघून गेली. मात्र, त्यानंतर ती पुन्हा घरी परत आलीच नसल्याने तिचा नातेवाईकांनी शोध घेवूनही ती मिळून आली नाही. ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी घडली. यानंतर अज्ञाताविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पो.उप.निरीक्षक फरांदे हे करत आहेत.