मिन्कोची १.५ दशलक्ष डॉलर्स निधी उभारणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१४ जानेवारी २०२२ । मुंबई ।  मिन्को या लहान किराणा व रिटेल दुकान मालकांना क्रेडिट सुविधा देणा-या रिटेल फिनटेक व्यासपीठाने मार्की गुंतवणूकदारांच्या माध्यमातून सीड फंडिंग फेरीमध्ये १.५ दशलक्ष डॉलर्स निधी उभारला आहे. नवीनच उभारलेल्या या निधींच्या माध्यमातून कंपनीचा भारतभरातील ऑफलाइन रिटेलर्स व लघु दुकान मालकांना त्‍यांचा व्यवसाय विकसित करण्यामध्ये मदत करण्यासाठी या विभागामधील २५० बिलियन डॉलर्सची क्रेडिट पोकळी भरून काढण्याचा मनसुबा आहे.

श्री. संकेत शेंदुरे व श्री. संमती शेंदुरे यांनी स्थापना केलेल्या मिन्कोने २०२१ मध्ये आपल्या कार्यसंचालनांना सुरूवात केली आणि आता वितरकांना बी२बी पेमेण्ट्स स्टॅक देते. वितरकांसाठी तंत्रज्ञान सहयेागी असण्याचा मनसुबा राखत कंपनीची प्रामुख्याने चार उत्पादने मिन्को क्यूआर कोड, मिन्को इन्वॉईस, मिन्को गोल्ड आणि मिन्को क्रेडिट सादर आहेत.

मिन्को क्रेडिट क्रेडिट स्टॅक देते, जे भारतातील दुकान मालकांना मिन्को अॅपच्या माध्यमातून तीन क्लिक्समध्ये त्यांच्या प्रदात्यांचे चलन भरण्यास लघुकालीन क्रेडिट सुविधा देते. मिन्को क्यूआर कोड रिटेलर्सना यूपीआयच्या माध्यमातून ग्राहकांकडून पेमेण्ट्स स्‍वीकारण्याची आणि अधिकाधिक स्थानिक ग्राहक मिळवण्याची सुविधा देते, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होऊ शकते.

मिन्को इन्वॉईसेस दुकान मालकांना यूपीआयच्या माध्यमातून वेळेवर त्यांच्या प्रदात्यांना देयके देत नियमितपणे रोख सूट मिळवण्याची सुविधा देते. तसेच हे उत्पादन वितरकांना मुदत-आधारित इन्वॉईसेस जारी करण्याची सुविधा देते, ज्यामधून वेळेवर पेमेण्‍ट होण्याची खात्री मिळते. ज्यामुळे कार्यसंचालन व रोख संकलन खर्चांची बचत होते. मिन्को गोल्ड हे सेव्हिंग स्टॅक आहे, जे अंतिम युजर्सना त्यांच्या कॅशबॅकला गोल्डमध्ये बदलण्याची सुविधा देते. या उत्पादनाच्या माध्यमातून क्‍लायण्ट्स गोल्डमध्ये दैनंदिन बचत सुरू करू शकतात, ज्यामुळे त्यांना दीर्घकालीन बचत योजना सुरू करण्यास मदत होऊ शकते.

मिन्कोचे सह-संस्थापक श्री. संमती शेंदुरे म्हणाले, “मिन्कोमध्ये आमचा वितरक व रिटेलर्सना त्यांचा व्यवसाय विकसित करण्यामध्ये मदत करण्यावर भर आहे. आम्ही काही विभिन्न पद्धतींसह हे कार्य करतो. कंपनीचा बी२बी पेमेण्ट्स स्टॅक वितरकांना रोख संकलन खर्च, क्रेडिट व्याज खर्च आणि पेमेण्ट्ससंदर्भात फॉलो-अप घेण्याचे कार्य कमी करण्यामध्ये मदत करतो. रिटेलर्ससाठी आम्ही मोबाइल अॅपची सुविधा देतो. या अॅपच्या माध्यमातून रिटेलर्स वेळेवर चलन भरू शकतात आणि रोख सूट / मोफत गोल्ड मिळवू शकतात. ते कार्यकारी भांडवलासाठी अत्यंत सुलभपणे लघुकालीन क्रेडिट देखील घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायाची उलाढाल व मार्जिन्स वाढवण्यामध्ये मदत होऊ शकते.”


Back to top button
Don`t copy text!