दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या बंधाऱ्यांची कामे, साठा बंधारा दुरूस्ती, पाझर तलाव दुरूस्तीची कामे, नियोजित लघु पाटबंधारे तलावासंदर्भातील प्रलंबित कामे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
मंत्रालयात मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या अनुषंगाने प्रलंबित कामांचा आढावा जलसंधारणमंत्री श्री. गडाख यांनी घेतला.
राहुरी- नगर- पाथर्डी येथील ४५ कामांपैकी ४ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या १७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील जे बंधारे वाहून गेले आहेत, त्यांचे पुन्हा सर्वे करण्यासंदर्भात तसेच उर्वरित कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्यासंदर्भात मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी याबाबत मंत्री श्री.गडाख यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा केली.
तसेच चर्चा करण्यात राहुरी- नगर- पाथर्डी येथील ४५ कामांपैकी ४ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या १७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. उर्वरित कामांना लवकरच मान्यता देण्यासंदर्भात राज्यमंत्री तनपुरे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील कापुरवाडी येथील आडाचा दरा पाझर तलाव अवर्षणप्रवण क्षेत्रातील शेतक-यांना सिंचनासाठी अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या तलावाचा फुटलेला बांध तातडीने दुरूस्त करण्याबरोबरच त्यासाठी येणा-या खर्चास तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश मंत्री श्री. गडाख यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यात लघुपाटबंधारे योजनांची अंमलबजावणी करताना सांगोला तालुक्यातील मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. याचबरोबर मोहोळ येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे उर्वरित भूसंपादन करून त्यांना नियमानुसार मोबदला देण्यात यावा. प्रलंबित तलावाच्या कामास गती द्यावी, असे निर्देश श्री.गडाख यांनी दिले.
पुणे जिल्ह्यातील मौजे खामगाव, रांजणे, कौडगाव, आंबेड, ओसाडे, निगडे, तालुका वेल्हा येथील मौजे कर्नावड, मौजे टिटेघर, मौजे वडतुंबी, कोर्ले व इतर योजनेसंदर्भातील प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देशही श्री. गडाख यांनी दिले.
बैठकीस मृद व जलसंधारण विभागाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, आमदार संग्राम थोपटे, आमदार शहाजी पाटील, आमदार यशवंत माने आदीसह अधिकारी उपस्थित होते.