दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । सातारा । राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वा. कात्रज पुणे येथून भिलार, ता.महाबळेश्वर जि. साताराकडे प्रयाण. दुपारी 1 वा. भिलार, ता.महाबळेश्वर जि.सातारा येथे आगमन व कै. बाळासाहेब भिलारे यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट दुपारी 1.25 वा. भिलार येथून पाचगणीकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. शासकीय विश्रामगृह, पाचगणी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.15 वा खाजगी वाहनाने साताराकडे प्रयाण. दुपारी 3.15 वा. कोयना दौलत निवासस्थान, सातारा येथे. आगमन व मुक्काम.
शनिवार दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वा. कोयना दौलत निवासस्थान, सातारा येथून खाजगी वाहनाने दौलतनगर ता. पाटणकडे प्रयाण. सकाळी 11 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई, सह साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थिती.(स्थळ: लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक सभागृह, दौलतनगर), दुपारी 1.वा. शिवदौलत बँकेच्या सर्वसाधारण सभेस उपस्थिती.(स्थळ: शिवदौलत बँक,मुख्य कार्यालय,मल्हारपेठ,ता. पाटण) दौलतनगर ता. पाटण येथे राखीव व मुक्काम.
रविवार दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. दौलतनगर ता. पाटण येथून कराडकडे प्रयाण. दुपारी 12 वा. कराड येथे आगमन व सार्वजनिक गणपती विसर्जन ठिकाणी बंदोबस्त पाहणी. दुपारी 12.30 वा. कराड येथून साताराकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. कोयना दौलत निवासस्थान सातारा येथे आगमन व राखीव.सायं 5वा. सातारा शहरातील सार्वजनिक गणपती विसर्जन ठिकाणी बंदोबस्त पाहणी व कोयना दौलत निवासस्थान, सातारा येथे आगमन व मुक्कम