पाटणमधील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । सातारा । पाटण विधानसभा मतदारसंघासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध केला आहे. मतदारसंघातील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करावीत विशेषत: रस्त्यांची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा श्री. देसाई यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) संजय सोनवणे यांच्यासह महसूल, जिल्हा परिषदेकडील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाटण विधानसभा मतदार संघातील ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत त्या कामांचे उपयोगिता प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात यावे, अशा सूचना करुन श्री. देसाई म्हणाले जी कामे मंजूर आहेत त्या कामांची लवकरात लवकर तांत्रिक मान्यता घ्यावी. जी मंजूर व अपूर्ण कामे आहेत ती येत्या फेब्रुवारीअखेर पूर्ण करुन याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.


Back to top button
Don`t copy text!