दैनिक स्थैर्य । दि.१४ फेब्रुवारी २०२१ । सातारा । सातारा पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यात महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतला.
या आढावा बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, महिला व बाल विकास अधिकारी -विजय तावरे आदी उपस्थित होते.
यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा व महाविद्यालये सुरु झाली आहेत. महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थींपर्यंत पोहचून त्यांना आत्मसंरक्षणाचे धडे द्यावेत. त्याचबरोबर त्यांच्या विषयी असणाऱ्या कायद्यांची माहिती द्यावी.
या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 438 गावांना भेटी दिल्या आहेत. भविष्य काळात आणखीन गावांना भेटीदेण्याबात आराखडा तयार करा. महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात आणखीन प्रभावी राबवा, अशा सूचनाही श्री. देसाई यांनी केल्या.