कराड व सातारा येथील गणेश विसर्जन स्थळांची गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी


दैनिक स्थैर्य । दि. २० सप्टेंबर २०२१ । सातारा । नागरिकांनी शासनाने  व प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार गणपतीचे विसर्जन करण्याचे आवाहन गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कराड व सातारा येथील गणेश विसर्जान स्थळांची पाहणी  गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  घरगुती गणेशाचे विसर्जन नगरपालिकेने बांधलेल्या हौद्यात करण्यात यावे. नागरिकांनी जास्त गर्दी करु नये. तसेच गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूकीस  जास्त सभासद न घेता मोजक्याच सभासदांच्या उपस्थित गणतीचे विर्सजन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Back to top button
Don`t copy text!