हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या कुटुंबीयांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली सात्वंन भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
स्थैर्य, सातारा, दि.२४: भारतीय सैन्यदलात सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या चिंचणेर निंब येथील आज शहीद जवान सुजित किर्दत यांच्या घरी भेट घेऊन राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शहीद जवानाच्या प्रतिमेस अभिवादन केले आणि किर्दत कुटुंबीयांचे सात्वंन केले.   यावेळी आमदार आमदार महेश शिंदे उपस्थित होते.
       यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांनी शहीद जवान सुजित किर्दत यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहिली व शहीद जवान सुजित किर्दत  यांचे वडील नवनाथ, पत्नी सुवर्णा, मुलगा आर्यन, मुलगी इच्छा, भाऊ अजित यांचे सांत्वन केले.   यावेळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!