विद्यार्थींच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली महाविद्यालय परिसराची पहाणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१६ फेब्रुवारी २०२१ । सातारा । विद्यार्थींनीच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स व छत्रपती शिवाजी महाविद्यालय परिसराला अचानक भेट देऊन पहाणी करुन सुरक्षतेच्या दृष्टीने विद्यार्थींनीशी संवाद साधला.

यावेळी श्री. देसाई म्हणाले, कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत. विद्यार्थींनीच्या सुरक्षतेसाठी पोलीस विभागातील कर्मचारी साध्या वेशात महाविद्यालयाच्या परिसरात गस्त घालत आहेत. महाविद्यालयांचे विद्यार्थी नसतानाही महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या मुलांना आजच्या दिवस समज देवून सोडण्यात आले आहे.

विद्यार्थींनींना मोकळ्या वातावरणात व निर्भयपणे शिक्षण घेता यावे म्हणून महाविद्यालय परिसरात निर्भया पथक काम करीत आहे. त्यांचे काम चांगल्या प्रकारे सुरु असून विद्यार्थींनींना निर्भयपणे शिक्षण घेता यावे शासनाची प्राथमिकता आहे, असेही श्री. देसाई यांनी पहाणी वेळी सांगितले.

महाविद्यालय परिसरात साध्या वेशात पोलीस व महिला पोलीस कर्मचारी असतात. त्यामुळे आम्हाला महाविद्यालय परिसरात भितीचे वातावरण वाटत नाही. आम्ही मोकळ्या वातावरणात व निर्भयपणे शिक्षण घेत असल्याच्या भावना विद्यार्थींनीनी श्री. देसाई यांना बोलून दाखविल्या.


Back to top button
Don`t copy text!