शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच धार्मिक स्थळांना भेट द्यावी – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे जनतेला आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । सातारा । राज्य शासनाने आजपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली केली आहेत. नागरिकांनी धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेट देत असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच भेट द्यावी, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

श्री. देसाई यांनी दत्त मंदिर, पंचमुखी गणेश मंदिर व साईबाबा मंदिरात भेट देवून तेथील व्यवस्थेची पहाणी केली. यावेळी ते बोलत होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभमीवर शासनाने राज्यातील धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. आज घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे उघण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेटी देत असताना नागरिकांनी  मास्कचा वापर, सामाजिक अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता ठेवावी व शासनाने दिलेल्या नियमांचे   काटेकोरपणे पालन करावे असेही आवाहनही श्री. देसाई यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!