
स्थैर्य, पाटण, दि. २४ : काल रात्री अचानक पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ६ वरुन २४ वर गेली असून यामध्ये एका दिवसात १८ रुग्ण वाढले आहेत.त्यामुळे पाटण तालुक्यात काळजीचे सावट निर्माण झाले आहे.तालुक्यातील बनपुरी, ताईचीवाडी (शिरळ), म्हावशी, चाळकेवाडी (कुंभारगांव), धामणी याठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन दिवसापुर्वी कोरोनाचे रुग्ण सापडले होते.
काल रात्री बनपुरी,शितपवाडी, भालेकरवाडी,भरेवाडी,गावडेवाडी व शिरळ या सहा गावांत कोरोनाचे १८ रुग्ण सापडले आहेत. गेल्या दोन महिन्यापासून तालुक्याचे आमदार आणि राज्याचे मंत्री ना.शंभूराज देसाई कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सातत्याने तालूक्यात अलर्ट असून या पार्श्वभूमिवर ते हायअलर्ट झाले आहेत कोरोना रुग्ण सापडलेल्या बनपुरी शिरळ गावांना भेटी दिल्या होत्या आज त्यांनी तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेवून म्हावशी या गांवासही भेट देवून पहाणी केली व कुणीही भिऊन जावू नका असे आवाहन करीत त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याकरीता आम्ही सर्वजण कार्यरत आहोत असेही सांगितले. पहिल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासण्या केल्यानंतर ही रुग्णांची संख्या प्रत्येक गांवामध्ये वाढली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.