स्थैर्य, पांचगणी, दि. 21 : वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधासभा मतदार संघात करोनाला रोखण्यासाठी अधिकारी यांचे कडुन केल्या गेलेल्या उपाय योजनांचा हिरडा विश्राम गृहावर झालेल्या बैठकीत गृहराज्य मंत्री ना. शंभुराज देसाई यांनी आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले व लवकरच वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुका कोरोना मुक्त होईल असा विश्वासही त्यांनी या बैठकीत व्यक्त केला.
वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात सध्या करोनाची स्थिती कशी आहे याचा आढावा घेण्यासाठी येथील हिरडा विश्राम गृहावर अधिकारी यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीला प्रांताधिकारी संगिता राजापुरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, जिल्हा प्रशासन अधिकारी रवि पवार, तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, तालुका वैदयकिय अधिकारी डॉ. भगवान मोहीते, गट विकास अधिकारी नारायण घोलप, पांचगणीचे पोलिस उपनिरीक्षक सतिश पवार, निलकंठ राठोड नायब तहसिलदार श्रीकांत तिडके आदी अधिकारी उपस्थित होते.
सध्या तीन तालुक्यात करोनाचे रूग्ण व त्यांचेवर कोठे व कशा प्रकारे उपचार केले जातात तसेच सध्या या तीन तालुक्यात कोठे कोविड सेंटर आहे तसेच मुंबई वरून आलेल्यां पैकी किती जन क्वारंटाईन मध्ये आहेत याची माहीती प्रांताधिकारी संगिता राजापुरक यांनी तर जिल्हयाची सिमा कशा प्रकारे सील केल्या आहेत याची माहीती पोलिस उपविभागीय अधिकारी अजित टिके यांनी दिली. ग्रामिण भागातील ग्राम समित्यांच्या कामाचा आढावा गट विकास अधिकारी यांनी सादर केला विविध खात्यांच्या अधिकारी यांनी आढावा सादर केल्या नंतर त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच शासकिय आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या सुचना या बैठकीत अधिकारी यांना ना देसाई यांनी दिल्या.