
दैनिक स्थैर्य | दि. 25 फेब्रुवारी 2025 | फलटण | ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे, आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या पश्चात सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सौ. सुरेखा, सुना नातवंडं असा मोठा परिवार आहे.
अंतिम दर्शन आज, मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० ते ४:०० वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी होणार आहे. अंत्यविधी बोराटवाडी ता. माण जिल्हा सातारा येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.