
दैनिक स्थैर्य । 22 एप्रिल 2025। फलटण । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारकासाठी पाठपुरावा करून तब्बल 143 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी सत्कार केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजारांच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली आहे.
हा निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांचे विडणी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच सागर अभंग यांनी सत्कार करत आभार मानले.