वरळी येथील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ४ जुलै २०२१ । मुंबई । वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण शिबिरास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. त्याचबरोबर वरळी सी फेस म्युनिसिपल शाळेत पोलीस बांधवांच्या परिवारासाठी आयोजित लसीकरण केंद्रासही भेट देऊन पाहणी केली.

कोळी भवन येथे या परिसरातील कोळी बांधवांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले असून वरळी म्युनिसिपल शाळेत पोलिसांच्या कुटुंबियांना व परिसरातील नागरिकांना लस उपलब्ध केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आनंद राठी आणि ‘लिव्ह टू गिव्ह फाऊंडेशन’ आणि सुराना हॉस्पिटलच्या सौजन्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये सुमारे पंधराशे जणांचे लसीकरण केले जाणार आहे.

यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, पोलीस उपायुक्त परमजित सिंह दहिया, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!