स्थैर्य, कोल्हापूर, दि. 22 : मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाचा बोगस पास घेवून जिल्ह्यात प्रवेश करत असलेल्या मिनी बस व कारमधील प्रवाशांना घेवून कोल्हापूरकडे येत असलेल्या बस मधील नऊ व कारमधील पाच जणांना किणी टोल नाक्यावर पकडून वडगाव पोलिसांनी पकडले. बसमधील प्रवाशांना पोलीस ठाण्याकडील मिनी बस मधून पुन्हा मुंबईकडे पाठविण्यात आले. तर कारमधील प्रवाशी सीपीआर येथे पाठविण्यात आले. ही दोन्ही वाहने वडगाव पोलिसांनी जप्त केली असून बोगस पास देणारा व चालक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईमध्ये खाजगी प्रवासी बस वाहतुकीचा गोरखधंदा या कारवाईमुळे उघडकीस आला आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवासाचा बोगस पास घेवून कोल्हापूरकडे येत असताना मिनी बस व कार पोलिसांनी पकडून त्यांना परत मुंबईकडे पाठविण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मलिरगे व सुळे गावातील लोकांना मुंबई येथून या दोन्ही गाड्या येत होत्या. सर्व टोल नाके पास करून या गाड्या आल्या मात्र किणी टोल नाक्यावर या वाहनांचे पास तपासले असता हे पास बोगस असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले असता ही वाहने ताब्यात घेवून वडगाव पोलीस ठाण्याकडे आणण्यात आली. जिल्हापोलीस मिनी बसमधील नऊ प्रवाशांना वडगाव पोलीस ठाण्याकडे जिल्हा पोलीस कार्यालयाने पाठविलेल्या मिनी बसमधून पुन्हा मुंबईकडे पाठविण्यात आले आहेत तर कार मधील लोकांना सीपीआर रूग्णालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. वडगाव पोलिसात बोगस पास तयार करून देणार्या विरोधात व वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करून ही दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे करत आहेत.