अकराव्या आणि बाराव्या शतकात पश्चिम युरोप मध्ये कॅथोलिक चर्च गावोगावी जाऊन पैसे उकळून गगनचुंबी कॅथेड्रल बांधत असे. सतराव्या आणि अठराव्या शतकानंतर मात्र त्यांनी पैसे आणि उर्जा वैज्ञानिक संशोधनासाठी खर्च करायला सुरुवात केली. म्हणून आज ते राफेल विमानं बनवू शकतात आणि आपण अमाप पैसा खर्च करून ते विकत घेतो.
लिंबू मिरच्या बांधण्यांचं विसरत नाही. खरंच आपली मानसिकता बदलणार कधी ? लाखोची चार चाकी लिंबू मिरची, पै पै जोडून हप्ता हप्त्याने व्याज भरुन निवासी इमारतीत उलटी बाहुली, कासव पूजन, मांडूळ तस्करी या श्रद्धा अंधश्रध्देतून बाहेर पडल्याशिवाय प्रगती होणार नाही. शरीराच्या वजनापेक्षा असे न केल्यास विपरीत घडले. या अनामिक भितीपोटी मानसिक वजन वाढत आहे. ते कमी करावे लागेल. नाय तर यंत्रसामग्री जमान्यात हळदी कुंकू वाहून पूजन करणे कितपत योग्य आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यास आपण आघाडीवर आहे. पण त्यांच्या संशोधक वृत्तीचे अनुकरण केल्यास भारतीय महासत्ता निश्चित होईल. पूजन हा संस्कृतीचा पाया आहे. आपण पायातच न घुटमळता ध्येयवादी कळसाकडे झेपवणे. हाच लिंबू मिरची बांधण्याचा मतितार्थ होईल.