
स्थैर्य, लोणंद, दि. ०४ (सुरेश भोईटे) : सालपे येथे वादळामुळे ऊडाले घराचे छप्पर शेतकऱ्याचे सत्तर हजाराचे नुकसान…. सालपे ता. फलटण या ठीकाणी बुधवार दि. ३ रोजी पाऊस व वादळी वाऱ्याने घराचे छप्पर, विजेचा चालु खांब मोडून पडल्याने सर्वत्र विजेच्या तारा पसरलेल्या होत्या मात्र तत्पर याची माहिती मिळताच विज वितरण कंपनीच्या लोकांनी वेळीच येऊन विजेचा प्रवाह बंद केलेने होणारा अनर्थ टळला. लोणंद सातारा रस्त्याशेजारीच सालपे येथील शेतकरी रमेश भिकाजी शिंदे यांनी गट नं १०० मध्ये तीस बाय पंधरा जागेत आपले नविन घर ऊभारले होते. या घराच्या छतावर लोखंडी पत्रा होता. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्याने घरावरील लोखंडी चॅनेल व पत्रा ऊडून घराचे मोठे नुकसान झाले यामध्ये घरावरील एक हजार लीटरची सिंन्टेक्सची पाण्याची टाकी फुटलेली आहे,, दरवाजाची नासधुस झाली आहे, पत्राही खराब झालेला आहे. पंचवीस थैली कांदयाची भिजून खराब झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही.
सालपे येथील तलाठी श्री. अडसुळ यांनी या घराच्या मालकाची भेट घेऊन नुकसान झालेल्या घराची पहाणी केलेली आहे. लवकरात लवकर आपणास नुकसान भरपाई मिळवून देऊ अशी ग्वाही दिलेने या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत सबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या गरीब शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी परिसरातील जनतेमधुन होत आहे.