मिलेनियल्सचे करबचतीसह दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य : पेटीएम मनी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । मुंबई । ईएलएसएस फंड्स आणि एनपीएस यांच्यासारख्या दीर्घकालीन करबचत करणाऱ्या साधनांमध्ये मिलेनियल्सच्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असल्याचे पेटीएम मनीने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालातून निदर्शनास आले आहे.

‘सेव्ह दि टॅक्स’: म्युच्युअल फंड्स एसआयपी प्रवाहातून मिलेनियल गुंतवणूकदारांमध्ये अधिक शिस्तबद्धता दिसते. २०२१ मध्ये प्रति वापरकर्ता एसआयपीच्या संख्येत सरासरी ३० टक्के वाढ झाली असून सरासरी एसआयपी मूल्य १६ टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. अशाच प्रकारचे प्राधान्य ईएलएसएस निधीतही दिसले असून या निधींमधील सरासरी गुंतवणूक २३ टक्क्यांनी वाढली. ईएलएसएस निधीत गुंतवणूक करणाऱ्या मिलेनियल्सच्या प्रमाणातही २०२० मध्ये २६ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. हे निधी करबचत करणारी साधने असून ३ वर्षांचा लॉक इन कालावधी असल्याने वरील संख्या गुंतवणुकीच्या दिशेने परिपक्व दृष्टीकोन दर्शवते.

दीर्घकालीन गुंतवणूकीचा विचार: नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या मिलेनियल्सची संख्या २०२१ पेक्षा दुप्पट झाली आहे. एनपीएस व्यवस्थापनाअंतर्गत एकूणच मालमत्ता ३८९ टक्क्यांनी वाढली असून गुंतवणुका पेटीएम मनी प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात आल्या. एनपीएस हे अत्यंत दीर्घकालीन गुंतवणूक असून कर ऑप्टिमायझेशन फायदे आणि अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी मिलेनियल्समध्ये असलेले प्राधान्य गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन वचनबद्धता दर्शवते.

मिलेनियल्स सज्ज: समभाग बाजारपेठेतील भारताचा रिटेल सहभाग २०२१ मध्ये कायम राहिला. त्याचे नेतृत्व पुन्हा एकदा मिलेनियल गुंतवणूकदारांनी केले असून सुमारे ८० टक्के पेटीएम मनी गुंतवणूकदार ३५ वर्षे वयाखालील होते. परंतु मागील वर्षभराच्या कालावधीत नवीन मिलेनियल गुंतवणूकदार वाढीस लागले.

समभाग एयूएम ट्रिपल्स: समभाग वर्गात व्यासपीठावर प्रति वापरकर्ता व्यवस्थापनाअंतर्गत सरासरी मालमत्ता २०२१ मध्ये तिप्पट झाल्या. प्रति वापरकर्ता व्यवहार करण्यात आलेल्या सरासरी शेअर्सची संख्या १२ वरून ३० वर गेली आणि त्यातून अधिक वैविध्यपूर्णता दिसून आली. २०२१ मध्ये ईटीएफ खरेदी करणाऱ्या मिलेनियल्सचे प्रमाणही वेगाने वाढल्याचे दिसले आणि पोर्टफोलिओतील ईटीएफची सरासरी संख्या ५० टक्क्यांनी वाढली.

इंट्राडे ट्रेडिंग अधिक लोकप्रिय: २०२१ मध्ये मिलेनियल्सकडून व्यापारी कार्ये २०२१ मध्ये अधिक वाढली. इंट्रा डे वर व्यापार करणाऱ्या मिलेनियल वापरकर्त्यांचे प्रमाण २०२० मध्ये ३९ टक्क्यांवरून २०२१ मध्ये ५० टक्क्यांवर गेले तर एफअँडओ विभागात प्रति वापरकर्ता सरासरी ३२७ व्यवहार दिसून आले. ७० टक्के मिलेनियल वापरकर्त्यांनी प्रति वापरकर्ता ८ अ‍ॅप्लिकेशन्ससोबत आयपीओसाठी अर्ज केले.

जास्त धोक्याची क्षमता: म्युच्युअल फंड्समध्ये प्रति वापरकर्ता सरासरी गुंतवणुकीची रक्कम ३५ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत असल्याने मिलेनियल्सनी पॅसिव्ह गुंतवणूक कायम ठेवली. या विभागासाठी व्यवस्थापनाअंतर्गत एकूणच मालमत्ता मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाल्या आणि १०९ टक्क्यांनी वाढल्या. तथापि यात स्मॉल कॅप निधीला जास्त प्राधान्य होते आणि जास्त धोका पत्करण्याची क्षमता दिसून आली. ४२ टक्के मिलेनियल्सनी २०२१ मध्ये स्मॉल कॅप फंड्समध्ये गुंतवणूक केली असून २०२० मध्ये हे प्रमाण ३१ टक्के होते. पेटीएम मनीवर सर्वाधिक व्यापार केलेल्या १० म्युच्युअल फंड्सपैकी ३ फंड्स स्मॉल कॅप वर्गवारीतील होते, तर १ फंड मिड कॅप वर्गातील होता.

महिला शक्तीत वाढ: आणखी एक स्वारस्यपूर्ण ट्रेंड म्हणजे गुंतवणूकदार महिला वापरकर्त्यांची संख्या मागील वर्षी दुपटीपेक्षा जास्त वाढली असून ती ११४ टक्क्यांनी वाढली आणि पुरूष सहकाऱ्यांच्या तुलनेत महिला गुंतवणूकदारांच्या जास्त टक्केवारीला फायदा झाला.

पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरूण श्रीधर म्हणाले की, “२०२१ हे भारतीय शेअर बाजारांसाठी एक बदलांचे वर्ष होते. मागील एका वर्षात आम्हाला मिलेनियल गुंतवणूकदार परिपक्व झालेले दिसले, कारण त्यांनी आपल्या उत्पादनांचे वैविध्यपूर्णत्व करून दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला. इंट्राडे ट्रेडिंग आणि एफअँडओमध्ये जास्त सहभाग झाल्यामुळे आत्मविश्वास वाढला. हे गुंतवणूकदार वित्तीय संकल्पना समजून घेण्यात जास्तीत-जास्त वेळ घालवताना पाहणे प्रोत्साहक होते. हा प्रवाह भारताच्या तरूण गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला आणि आम्ही भविष्याबाबत खूप उत्सुक आहोत.”


Back to top button
Don`t copy text!