
दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मिलिंद नेवसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झालेली आहे. मिलिंद नेवसे यांचे पक्षातील कार्य हे सर्वांना माहित आहे, त्यामुळेच विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मिलिंद नेवसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिलेली आहे. आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्यात ओबीसी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिलिंद नेवसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कार्यरत राहतील व राष्ट्रवादीची ओबीसी सेल बळकट करतील, असा विश्वास सर्वांना आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण येथील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या “सरोज – व्हिला” या निवासस्थानी मिलिंद नेवसे यांचा विशेष सत्कार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. या वेळी श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, जेष्ठ नेते भीमदेव बुरुंगले, दत्तोपंत शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी काम करण्याची संधी मिळाली आहे. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी या वेळी व्यक्त केले.