दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । सातारा । कोयना धरण परिसराला मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसलाय. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागातील काडोली गावाच्या पश्चिमेला ७ किमी अंतरावर आहे.
८ जानेवारीनंतर १ फेब्रुवारीला सकाळी ९.४७ ला भूकंपाचा सौम्य धक्काने कोयना परिसर हादरला आहे. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाच्या धक्क्याची खोली ४५ इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून जवळच काडोली गावाच्या पश्चिमेस ७ किमी होते. हा धक्का कोयना परिसरात जाणवलाय. या धक्क्यामुळे पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे तहसीलदार रमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
गेल्या महिन्यात ८ जानेवारीला कोयना परिसरात झालेल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना विभागात हेळवाक या गावाजवळ होता. एका महिन्यानंतर याच परिसरात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू एक किमी पुढे सरकून तो काडोली या गावाजवळ गेला आहे. केंद्रबिंदू सरकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.