म्हसवडकर करोना योद्यांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, म्हसवड, दि. २३ : म्हसवड येथे गेले चार महिने करोना वायरस या महामारी मुळे लॉकडाऊन सुरु आहे. याकाळात आज अखेर अविरत 126 दिवस  मोफत अन्नदान देण्याचा उपक्रम राबवत असलेले या टिमचे एल के सरतापे व करोनाच्या भिती पोटि शहरातील आपली दवाखाने हॉस्पीटल बंद ठेवून इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय केली मात्र डॉ राजेंद्र मोडासे ह्याचा एकमेव दवाखाना 24 तास उघडा ठेवून करोनाच्या महामारीत रुग्णांची सेवा करुन माणुसकी जपण्याचे सामाजिक काम एल के सरतापे व त्यांची टिम आणि डॉ राजेंद्र मोडासे  खरे कोरोना योध्दा ठरले आहेत असे मत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकास्तरीय नेते प्रा विश्वंभर बाबर यांनी सरतापे व योगासने यांच्या सत्कारा दरम्यान व्यक्त केले. 

माण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतिने डॉ राजेंद्र मोडासे व एल के सरतापे यांचा कोरोना योध्दा म्हणून  गौरव माण तालुका कॉग्रेसचे नेते प्रा विश्वंभर बाबर, कॉग्रेस पक्षाचे म्हसवड पालिकेतील नगरसेवक विकास गोंजारी, राष्ट्रीय कॉग्रेस मागासवर्गीय सेलचे अनिल लोखंडे, अमोल जंगम, प्रविण भोसले, डॉ सौ मोडासे व डॉ. मोडासे उपस्थित होते.  

यावेळी प्रा. बाबर यांनी सत्कारा दरम्यान बोलताना म्हणाले कोरोना या संसर्गजन्य आजाराची परवा न करता लॉकडाऊनमुळे बंद असलेली हॉटेल, खाणावळ, ढाबे यामुळे एकवेळ जेवण हि कोठे मिळत नव्हते त्यांना दोनवेळचे जेवन वेडसर, फिरस्ती, निराधार, वृध्द त्याच प्रमाणे दवाखान्यात व हॉस्पीटल मध्ये विविध आजाराने उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना.  एल के सरतापे यांच्या आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या वतीने दोन घास सुखाचे या नावाने जेवून पुरवण्याचे काम कोरोनाला न भिता टिम करत आहे तीच खरी कोरोना योध्दा आहे. त्याच प्रमाणे डॉ राजेंद्र मोडासे यांनी हि कोरोनाच्या काळात आपली ओपीडी सुरु ठेवून आजारी लोकांना 24 तास सेवा दिली त्याच प्रमाणे सेवा देतात म्हणून त्यांची बदनामी हि केली मात्र त्याला न डगमगता आपली रुग्णसेवा सुरु करुन आजारी लोकांना मोठा आधार देण्याचे काम करणारे डॉ राजेंद्र मोडासे हे हि खरे कोरोना योध्दा ठरले असल्याचे प्रा बाबर यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!