म्हसवड सिद्धनाथ यात्रा अखेर रद्द; रथाचे स्थिर दर्शन चालू राहणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ डिसेंबर २०२१ । म्हसवड । दहिवडी उपकेंद्र हद्दीत म्हसवड ता माण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीची यात्रा दिनांक 3 ते 7 या कालावधीत साजरा होणार असून यात्रेचा मुख्य दिवस 5 डिसेंबर आहे. यात्रेच्या अनुषंगाने प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या कार्यालयात यात्रा अनुषंगाने मिटिंग आयोजित केली होती. सदर बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, माण तहसीलदार सूर्यकांत येवले, सपोनी बाजीराव ढेकळे, म्हसवड पोलीस ठाणे तसेच तालुक्यातले सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यात्रा अनुषंगाने मीटिंग

प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीयस्तरीय व माण तालुका स्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची म्हसवड यात्रा अनुषंगाने बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाकडील आदेश दिनांक 27 नोव्हेंबर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्याकडील आदेश दिनांक 29 नोव्हेंबर बाबत सविस्तर चर्चा झाली. माण खटाव मधील यात्रा बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्याशी दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या चर्चेबाबत आणि त्यांनी दिलेल्या निर्देश सूचना बाबत उपस्थितांना माहिती सांगितली.
म्हसवड यात्रा होणाऱ्या नियोजित यात्रा उत्सव मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गावाबाहेरून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गावाबाहेरून दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे संपूर्ण लसीकरण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या दृष्टीने यात्रा उत्सवासाठी गावाबाहेरून येणाऱ्या वैयक्तिक भाविकांच्या लसीकरण कागदपत्र तपासणी आरोग्य विभागाने शिक्षण महसूल नगरपालिका व इतर विभागाच्या मदतीने करून पात्र व्यक्तींची RTPCR तपासणी करून पात्र व्यक्तींना रांगेने दर्शनासाठी सोडावे असे सर्वसंमतीने ठरले.

1) म्हसवड यात्रा उत्सव 20 21 चे नियोजन हे कोरोना च्या सर्व नियमांचे पालन व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून धार्मिक विधी संबंधित व्यक्ती देवस्थान ट्रस्ट यांनी करण्यास हरकत नाही.
2) रथ प्रदर्शनास परवानगी नाकारण्यात येत आहे. रथ हा यात्रा पटांगणात स्थिर राहील त्यांच्याभोवती डबल बँरेकेटींग करण्यात यावे.
3) वैयक्तिक भावीक जे covid-19 कोरोना च्या सर्व नियमांचे व शासनाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे सूचनांचे पालन करतील त्यांना दर्शनास परवानगी राहील.

4) कोणत्याही सामूहिक स्वरूपाची कृती करता येणार नाही
5) मंदिरातील श्रींची मूर्ती व रथावरील पवित्र वस्तू व रथाचे दर्शन बॅरेकेंटिंगच्या बाहेरून घ्यावे.
6) कोरोनाच्या निर्बंधाच्या अनुषंगाने श्रींची मूर्ती पालखी रथ व सर्व इतर वस्तूंना स्पर्श करण्यास मनाई करण्यात येत आहे.
7) तात्पुरती दुकाने व मनोरंजनाची साधने फेरीवाले हातगाड्या यांना परवानगी नाकारण्यात येत आहे.
8 वाहनांच्या पार्किंग वाहतूक व व्यवस्थापन पोलीस विभागाचे आवश्यक ते निर्बंध लावावे.
9) बाहेरगावाहून येणाऱ्या दिंड्या पालख्या सासनकाठी इत्यादींना मनाई करण्यात येत आहे.
10 ) ध्वनीफित वापराबाबत पोलिस विभागाने आवश्यक असे निर्बंध लावावे.
11) मंदिर व्यवस्थापनाने ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
12) नगरपालिका स्तरावर मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करून कार्यवाही करावी.
13) आरोग्य विभागाने तपासणी लसीकरण इत्यादी तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्या 10 टीम उपलब्ध कराव्यात त्यांना मदत करण्यासाठी पोलिस विभाग महसूल विभाग निहाय 2 अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.
शिक्षण विभागाने 6 शिक्षक उपलब्ध करून द्यावे
नियंत्रण कक्षासाठी प्रत्येक शासकीय विभागाने एक पर्यवेक्षक दर्जाचा अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध करून द्यावा
15)नगरपालिकेने पोलीस विभागाच्या समन्वयाने आवश्यक ते बॅरेकेंटिंग 3 12 2021 च्या रात्री 8 पर्यंत करून घ्यावी.
आणि स्वच्छता पाणीपुरवठा आणि सुविधा पुरवाव्यात.
16) इतर सर्व शासकीय विभागांनी आपल्या विभागाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या.
17) उत्सवाच्या दिवशी पूर्णवेळ कार्यकारी दंडाधिकारी मंदिर व यात्रा पटांगणात उपस्थित राहतील.
18)श्रींची मूर्ती पालखी रथ व इतर मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संबंधित मंदिर प्रशासन मानकरी सालकरी यांच्यावर आहे.


Back to top button
Don`t copy text!