म्हसवड बंदला संमिश्र प्रतिसाद


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२१ । म्हसवड । उत्तर प्रदेश मधील लखीमपुर,खेरी येथे शेतक-यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ काॅग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना, व इतर संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते त्या बंदला म्हसवड व परिसरात समिश्र प्रतिसाद मिळाला या बंद मधून शाळा, काॅलेज, बस सेवा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती.

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षाच्या वतीने काल बंदचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी बंद बाबत पुन्हा तिन्ही पक्षांच्या वतीने दुकानदारांना आवाहन शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते शिवसेना माण तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका संघटिका सौ.पुनम माने,राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कविताताई म्हेत्रे, शहराध्यक्ष युवराज सुर्यवंशी,काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने,शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल मंगरुळे, उपतालुकाप्रमुख शिवदास केवटे, युवासेना शहराध्यक्ष सोमनाथ कवी, उपशहरप्रमुख आनंद बाबर, प्रसाद माने व शिवसैनिक सहभागी होते


Back to top button
Don`t copy text!