
दैनिक स्थैर्य | दि. 05 सप्टेंबर 2024 | फलटण | गत काही महिन्यांपूर्वी फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओ ऑफिस सुरू करण्यात आले होते. फलटणची वेगळी ओळख असावी म्हणून तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याने फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले होते. आजपासून फलटण येथून रजिस्टर होणाऱ्या सर्व नूतन गाड्यांना MH 53 या नंबरने गाड्या पासिंग होणार असल्याची माहिती भाजपा फलटण तालुकाध्यक्ष अमोल सस्ते यांनी दिली.