स्थैर्य, मुंबई, दि.२५: एमजी मोटर इंडियाने आपल्या सर्व कर्मचा-यांना कोव्हिड-१९ लसीकरणाचे कवच प्रदान करण्यासाठी पुढाकार घेतला असून लसीचा खर्च कंपनीद्वारे करण्यात येणार असल्याची घोषणा आज केली. लसीकरणाची मोहीम कंपनीच्या सध्याच्या वैद्यकीय विमा पॉलिसी व्यतिरिक्त असेल. कंपनीकडून दिलेले लसीकरण हे ऐच्छिक असून कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना या मोफत लसीकरण मोहिमेत शामील होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तसेच सर्व डीलर्स पार्टनर्स व ठेकेदार तसेच विक्रेत्यांना लसीकरणासाठी एमजीकडून आवाहान करण्यात येत आहे.
लसीकरण मोहीम राबवण्यासाठी एमजी गुरुग्राम व हलोल येथील प्रकल्प तसेच प्रादेशिक कार्यालयांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांसोबत कार्य करेल. कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कंपनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियंत्रण वाढवत, सुरक्षा नियम अधिक कठोर करत आहे.