एमजी मोटरद्वारे ऑटो एक्स्पोमध्ये ‘ड्राइव्ह अहेड’ संकल्पना सादर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । मुंबई । एमजी मोटर इंडियाने आज भविष्यातील मोबिलिटीचे स्वप्न, ड्राइव्ह.अहेड संकल्पना ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये प्रदर्शित केली. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधील १४ उत्पादनासाठी तयार वाहनांचे प्रदर्शन केले असून त्यातून ब्रँडचा शाश्वतता, जागरूकता आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावरील भर एमजीच्या भारतातील स्वप्नाचा भाग म्हणून संवादित केला जाईल.

एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव छाबा म्हणाले की, “आम्ही शाश्वत, मनुष्याधारित आणि भविष्यात्मक तंत्रज्ञानाने प्रेरित जगाच्या दिशेने काम करण्यावर विश्वास ठेवतो. आमचे ध्येय विचारपूर्वक आणि जागरूकता या दोन गोष्टी आयुष्याचा एक मार्ग असलेल्या वातावरणाच्या निर्मितीवर काम करण्याचे आहे. आमची येथे प्रदर्शित केली गेलेली ईव्ही आणि एनईव्ही श्रेणीतील उत्पादने एमजीची वचनबद्धता दर्शवतात आणि भारतात हरित व शाश्वत मोबिलिटीचा अंगीकार वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.”

कंपनीने दोन तंत्रज्ञानाने अद्ययावत, अधिक सुरक्षित आणि शून्य उत्सर्जन असलेली दोन विद्युत वाहने (ईव्ही) देखील यावेळी प्रदर्शित केली. त्याद्वारे त्यांनी या कार्यक्रमादरम्यान ऑटो तंत्रज्ञान ब्रँड म्हणून आपले विचार अधोरेखित केले. ही दोन नवीन वाहने एमजी ४, पूर्णपणे इलेक्ट्रिक हॅचबॅक ईव्ही आणि एमजी ईएचएस, प्लग इन हायब्रिड एसयूव्ही आहेत. ही दोन्ही वाहने देशात ईव्हीचा वापर आणखी वाढवण्याच्या एमजीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतात.

इतर वाहनांप्रमाणेच ही दोन्ही वाहने एमजीच्या पॅव्हिलियनमधील उत्पादनांचा भाग आहेत, भविष्याधारित आहेत आणि तंत्रज्ञान व त्यांचा पर्यावरणात्मक पाया या संदर्भात नावीन्यपूर्णता आणि दूरदर्शिता यांचे मिश्रण आहेत. तसेच ते या वर्षीच्या ऑटो एक्स्पोसाठी एमजीच्या संकल्पनेचा पुनरूच्चार करतात- ड्राइव्ह.अहेड आणि एक्स्पोमधील ईव्हीवर देण्यात आलेला भरही दर्शवतात. ही दोन्ही वाहने अद्ययावत सुरक्षा वैशिष्टे आणि वाढीव ड्रायव्हिंग आरामदायीपणासोबत येतात.

एमजी४ ईव्ही हॅचबॅक भरपूर जागा असलेली इंटिरियर घेऊन येते. त्यामुळे पाच वेगवेगळ्या चार्जिंगच्या पर्यायाद्वारे ड्रायव्हिंग अत्यंत सुलभपणे होऊ शकते. २०२२ मध्ये ही गाडी बाजारात आल्यापासून एमजी४ ईव्ही हॅचबॅक ही गाडी जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इटली, स्पेन, नॉर्वे आणि स्वीडन अशा २० पेक्षा जास्त युरोपियन बाजारपेठांमध्ये विकली जाते.

एमजी ईएचएस प्लग इन हायब्रिड ही गाडी भरपूर जागा असलेले इंटिरियर आणि उत्तम बाह्यरचना यांच्यासह कार्यक्षमता आणि कामगिरी या दोन्ही गोष्टी एकत्र आणते. एमजी ईएचएस प्लग-इन हायब्रिड खऱ्या अर्थाने दोन्ही जगांमधील सर्वोत्तम बाबी देते. या ड्राइव्ह सिस्टिममध्ये एक इलेक्ट्रिक मोटर, एक बॅटरी पॅक आणि एक शक्तिशाली पेट्रोल इंजिन आहे, जे उत्तम कार्यक्षमता, ऊर्जा आणि रेंज यांच्यासाठी सहजपणे काम करते.

“आज ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी आमच्या पोर्टफोलिओमधील या दोन अप्रतिम आणि जागतिक स्तरावर गौरव केल्या गेलेल्या गाड्या आणताना खूप आनंद होत आहे. या वाहनांचे अनावरण ग्राहक संशोधन आणि बाजारातील अभिप्राय यांच्यावर अवलंबून असेल,” ते पुढे म्हणाले.

एमजीचे ऑटो तंत्रज्ञान आणि शाश्वत ब्रँड म्हणून असलेले स्थान भारतीय ऑटो उद्योगासाठी त्यांनी हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांमध्ये दिसून येते. झेडएस ईव्ही भारतात २०२० मध्ये आली तेव्हापासून या कारने पर्यावरणावर सकारात्मक परिणाम आणला आहे. आतापर्यंत त्यांनी सुमारे ७० लाख किलो कार्बन डाय

ऑक्साइडचे उत्सर्जन रोखले आहे, जे ४२,००० झाडे लावण्याच्या समकक्ष आहे. एमजीच्या मते ईव्हीचा वापर वाढवण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे एक सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे होय, ज्यामुळे लोकांना ई-मोबिलिटीचा वापर करणे शक्य होईल. एमजी चार्ज उपक्रमामधून भारतात चार्जिंग स्टेशन्स उभारली जातात आणि त्यांनी १५० पेक्षा अधिक स्टेशन्स उभारली आहेत.


Back to top button
Don`t copy text!