वंचित मुलींच्या शिक्षणासाठी एमजी मोटरचा ‘ई लर्निंग उपक्रम’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, २२ : वंचित मुलींना ‘न्यू नॉर्मल’ आयुष्यासाठी सज्ज करण्याच्या उद्ददेशाने एमजी मोटर इंडियाने ई लर्निंग उपक्रम सुरू केला आहे. इम्पॅक्ट या बालिका शिक्षणासाठी काम करणा-या एनजीओसोबत ‘इम्पॅक्टेक स्टुडिओ: ई शिक्षा, एक नई दिशा’ या नावाने उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वाहननिर्मात्याने ५ शहरांमध्ये १५ इम्पॅक्ट लर्निंग सेंटर्सना ई लर्निंग सुविधेसह सज्ज केले आहे.

भारतातील प्रवेशापासूनच एमजीने इम्पॅक्टसह सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उपेक्षित मुलींच्या शिक्षणासाठी सक्रिय भागीदारी केली आहे. आतापर्यंत एमजीने देशभरातील इम्पॅक्टच्या ५० शिक्षण केंद्रांना पाठबळ दिले आहे. एमजी आणि इम्पॅक्ट आता यापैकीच ५ शहरांतील १५ केंद्रांना ई लर्निंग सेंटरमध्ये रुपांतरीत करत आहेत.

सोबतच कंपनी इम्पॅक्टच्या मुख्यालयातील प्रशिक्षण आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधील तंत्रज्ञानाला आधार देते. तसेच ही कंपनी ११ राज्यांतील १८००+ इम्पॅक्ट एलसींना अधिक सखोल दृष्टीकोनाद्वारे अतिरिक्त बळ प्रदान करेल. या उपक्रमाचा पहिला उद्देश, विद्यार्थी आणि शिक्षकांर्पंत दर्जेदार कंटेंटचा प्रसार करणे हा आहे. त्यानंतर यातून शिक्षकांची व्यावसायिक उन्नती होईल. त्याद्वारे ग्रामीण भागातील मुलींची शिक्षणाची गरज योग्य पद्धतीने पुरवली जाईल.

प्रत्येक एमजी हेक्टर आणि एमजी हेक्टर प्लसच्या विक्रीतील एक शेअर थेट या बालिका शिक्षणाच्या उपक्रमास हातभार लावतो. एमजीने यापूर्वीही असाच उपक्रम राबवला होता. त्याद्वारे भारतातील ६०,००० पेक्षा जास्त मुलींच्या शिक्षणास मदत मिळाली होती.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, ‘आज, देशभरातील विद्यार्थी ‘स्टडी फ्रॉम होम’ मॉडेलनुसार शिकत आहे. मात्र, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी डिजिटल उपकरणांच्या कमतरतेमुळे हे शक्य नाही. त्यामुळेच शक्य तेवढ्या प्रमाणात हा फरक कमी करणे, हे इम्पॅक्टसोबतचे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच आमच्या शालाबाह्य मुलींना शिक्षणापेक्षा आणखी जास्त देण्याची आमची इच्छा आहे. या उपक्रमाद्वारे त्यांना पंख प्रदान करण्याचा आमचा मानस आहे.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!