एमजी मोटरने ग्राहकांकरिता ‘एमजी हेल्थलाइन’ सुरु केली


स्थैर्य, मुंबई, दि. २२: समाजसेवा आणि मदत करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या एमजी मोटर इंडियाने आपल्या ग्राहकांना २४x७ वैद्यकीय सल्ला सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज एमजी हेल्थलाइनची सुरुवात केली. या सुविधेद्वारे ग्राहकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत ऑनलाइन वैद्यकीय सल्ला मिळेल. एमजीचे ग्राहक ‘एमजीमोटरडॉटकोडॉटइन’ या संकेतस्थळावर किंवा ‘मायएमजी’ या एमजी अॅपवर या नोंदणी करून या सेवेचा लाभ घेऊ शकतील. डॉक्टर २४*७ प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी अंतर्गत या सेवा पुरवल्या जात असून तज्ञांची वैद्यकीय टीम एमजीच्या ग्राहकांचा पहिल्या कन्सल्टेशननंतर ७२ तासांच्या आत फॉलोअप घेतील.

‘एमजी सेवा’ अंतर्गत हा उपक्रम घेतला जात असून, या आव्हानात्मक काळात आमच्या ग्राहकांना मदतीचा हात याद्वारे दिला जाणार असल्याचे एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर आणि वरिष्ठ उपाध्यक्ष गौरव गुप्ता यांनी सांगितले.

एमजी सेवा अंतगत कारनिर्माता कंपनीने सध्याच्या आव्हानात्मक काळात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. कंपनीची हेक्टर अॅम्ब्युलन्स देशातील प्रभावित लोकांच्या सेवेत असतके. एप्रिल २०२१ मध्ये, कंपनीने गुजरातमधील देवानंदन गॅसेस प्रा. लि. सोबत भागीदारी केली. याद्वारे वडोदऱ्यातील उपरोक्त कंपनीच्या प्रकल्पात महिनाभराच्या आतच ऑक्सिजन निर्मिती ३१ टक्के प्रति तास या वेगाने वाढले. तसेच हे प्रमाण लवकर ५०% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. क्रेडिहेल्थच्या मदतीने नुकतेच कंपनीने गुरुग्राममधील कोव्हिड रुग्णांना २०० बेड्स पुरवले. तर पुण्यात निधी उभारणीद्वारे येथील प्रभावित भागात बायोडिग्रेडेबल बेडशीट्स वितरीत केले.


Back to top button
Don`t copy text!