स्थैर्य, मुंबई, १९ : एमजी मोटर इंडियाने भारतात व्हेइकल सबस्क्रिप्शनसाठी आघाडीचा पर्सनल मोबिलिटी मंच झूमकारसोबत भागीदारी केली आहे. याद्वारे एमजी मोटर आपल्या वाहन सबस्क्रिप्शन मंचासाठी झूमकारच्या एंड-टू-एंड टेक्नोलॉजी सोल्युशनचा लाभ घेईल. एमजीच्या नवीन वाहनांना झूमकारच्या परिवर्तनशील १२, २४ किंवा ३६ महिन्यांचे सबस्क्रिप्शन प्रोग्रामनुसार विस्तारून दिले जातील.
एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “ग्राहकांना या आकर्षक वाहन मालकीचा प्रस्ताव देण्यासाठी झूमकारसोबत हात मिळवणी केल्याचा आम्हाला आनंद आहे. आता ग्राहक आमची वाहने खरेदी करण्यापूर्वी त्यातील त्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांचा अनुभव घेऊ शकतील. सबस्क्रिप्शन मॉडेल भविष्यात एमजी वाहनांसाठी तसेच भारतातील वाहनप्रिय व्यक्तींसाठी अधिक सुलभ बनवले जाईल. झूमकारसोबतची आमची भागीदारी बाजारात मोठे आकर्षण निर्माण करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
झूमकार आणि एमजी मोटर पार्टनरशिप बुकिंग आणि वाहन लिस्टिंगसाठी ग्राहकांना २४x७ सपोर्टदेखील प्रदान करेल. ग्राहक अनुभवाचा भर ऑन-ग्राउंड फ्लीट मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स सपोर्ट, व्हेइकल शेड्युलिंग आणि ऑनबोर्डिंगसह कस्टमर सपोर्ट सर्व्हिसेससाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानास सक्षम करण्यावर असेल.