एमजी मोटर इंडिया बनली १००,००० आनंदी कुटुंबांचा भाग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ९ मे २०२२ । मुंबई । एमजी मोटर इंडियाने घोषणा केली की, कंपनी भारतातील १००,००० आनंदी कुटुंबांची भाग बनली आहे. हा टप्पा ब्रॅण्डचा सतत नवोन्मेष्कारावर केंद्रित प्रवास, अनुभवात्मक ग्राहक सेवा आणि स्थिरता व समुदायाप्रती समर्पिततेमधील नवीन उपलब्धीला सादर करतो.

नवीन तंत्रज्ञाने सादर करण्यापासून महिलांचे सक्षमीकरण करण्यापर्यंत एमजीने कार्सची विक्री करण्यासोबत परिवर्तन घडवून आणले आहे. ब्रॅण्डने भारताची पहिली इंटरनेट एसयूव्ही – हेक्टर, भारताची पहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही – झेडएस ईव्ही, भारताची पहिली ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रिमिअम एसयूव्ही – ग्लॉस्टर आणि वैयक्तिक एआय असिस्टण्ट व ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञान असलेली भारताची पहिली एसयूव्ही – एमजी अॅस्टर या वेईकल्स लाँच केल्या.

एमजीने कार्सना स्मार्टर व अधिक सुरक्षित करत कार-अॅज-ए-प्लॅटफॉर्म (सीएएपी) संकल्पनेला अधिक दृढ देखील केले आहे. ब्रॅण्ड स्थिरगतीने भारतातील सीएएसई (कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड व इलेक्ट्रिक) मोबिलिटीच्या दृष्टीकोनाकडे वाटचाल करत आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “कर्मचारी, डिलर्स, पुरवठादार आणि ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून एक भक्कम पाया स्थापित केल्यानंतर आम्हाला मिळालेल्या प्रेम व विश्वासासाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्सद्वारे भारतीय मोबिलिटी क्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची आणि एक शाश्वत भविष्य निर्माण करण्याची आमची समर्पितता दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. आमचे मुलभूत आधारस्तंभ – नवोन्मेष्कारी, अनुभव, विविधता आणि समुदाय यांच्याशी बांधील राहत आम्ही आमचे सर्वोत्तम देण्यासोबत सुरूवातीपासून आमच्यावर विश्वास ठेवत आलेल्या प्रत्येक भागधारकाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो. आज आम्ही आमची उत्पादने व उपक्रमांच्या माध्यमातून गतीशीलता व समुदायामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेची पुन्हा पुष्टी देतो, ज्याचा आम्‍हाला आनंद होत आहे. आम्ही वर्तमान स्थितीबद्दल आभार मानतो आणि भविष्याबाबत उत्सुक आहोत.”

एमजी मोटर इंडिया आपल्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक विविधता व सर्वसमावेशकतेसह अधिक समान व वैविध्यपूर्ण समाजाच्या निर्मितीला चालना देत आली आहे. कंपनीने फॅक्टरीसह आपल्या कर्मचारीवर्गामध्ये ३७ टक्के महिला कर्मचा-यांचा समावेश केला आहे आणि कंपनीचा डिसेंबर २०२३ पर्यंत हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा मनसुबा आहे.

एमजी प्रबळ सेवा आणि पर्यावरण व व्यक्तींप्रती आदरासह गतीशीलतेमध्ये मानवी क्षमतांची भर करते. स्थिरतेवर लक्ष केंद्रित करण्यासह ब्रॅण्ड चार्जिंग पर्याय वाढवत आणि ग्राहकांना ईव्हींच्या पर्यावरणविषयक लाभांबाबत जागरूक करत भारतामध्ये एण्ड-टू-एण्ड ईव्ही परिसंस्था निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहे. समुदाय, विविधता, अनुभव व स्थिरतेमध्ये उपक्रम राबवण्याचे कंपनीचे ध्येय ब्रॅण्डला कार्सची विक्री करण्यापलीकडे प्रभाव निर्माण करण्यामध्ये साह्य करत आहे.


Back to top button
Don`t copy text!