स्थैर्य,मुंबई, दि ३: मेट्रो ३ कारशेड कांजुरमार्गला हलविण्याच्या निर्णयामुळे ५ वर्षांचा विलंब आणि रुपये ५००० कोटी अधिक खर्च होणार आहे. याची जाणीव ठाकरे सरकारला होती/आहे. या वास्तविकतेपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी ठाकरे सरकारची नवीन “स्टंट बाजी”.
माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट केले होते की, कांजुरमार्गची जागा मी “मोफत मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीए ला देत आहे”.
आता ठाकरे सरकारनी नखरे सुरु केलेत या जागेवर केंद्र सरकारचा हक्क आहे……
ठाकरे सरकार अर्ध सत्य सांगत आहे. कांजुरची जागा ही वादात आहे हे स्पष्टपणे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, मनोज सौनिक समिती, अजोय मेहता समिती यांनी म्हंटले होते/आहे.
२०१५ मध्येच राज्य सरकारच्या समितीने स्पष्ट केलं होत की, कांजुरची जागा योग्य असली तरीही ती वादात आहे म्हणून हे कारशेड आरेच्या तिथे करणे अधिक योग्य आहे. त्या समितीत माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे सध्याचे सल्लागार श्री. अजोय मेहता ही होते.
श्री. उद्धव जी ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये श्री. मनोज सौनिक समिती नेमली त्या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट म्हंटले आहे की कांजूरची जागा वादात आहे. ५ वर्ष प्रकल्प पुढे गेला आहे. आता आरे कारशेड हलविणे योग्य नाही.
गेले महिनाभर मी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव कार्यालय, नगरविकास कार्यालय, एमएमआरडीए कार्यालय, एमएमआरसीएल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय…… ५० माहितीचा अधिकार अर्ज केले. मनोज सौनिक समितीचा रिपोर्ट ही मागितला, या जागेसंबंधीची माहिती ही मागितली.
“या ७ ही कार्यालयाने मनोज सौनिक समिती अहवाल व कांजूर कारशेड जागेसंबंधी दुसऱ्या खात्याकडे बोट दाखविले. मुख्यमंत्री कार्यालयाने नगरविकास कार्यालयकडे जाण्यास सांगितले, नगरविकास खात्याने मुख्यमंत्री कार्यालयकडे जाण्यास सांगितले”.
माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मनोज सौनिक समितीचा रिपोर्ट घोषित करावा आणि जनतेची फसवणूक थांबवावी असे आव्हान डॉ. किरीट सोमैया यांनी केले.