दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२३ । बारामती । शुभविवाह ची आठवण म्हणून घरासमोर,शेतामध्ये, अपार्टमेंट परिसरात, दुकानासमोर शक्य असेल तर शाळे भोवती रोपटे लावा त्यांचे संवर्धन करण्यासाठी व वृक्षा मध्ये रूपांतर होऊ पर्यंत खते, ट्री गार्ड देऊ अशी ग्वाही देत ,पर्यावरण वाचवा चा संदेश देत शुभविवाह संपन्न झाला.बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निबोडी चे मा सरपंच व दुध संघाचे संचालक किशोर फडतरे यांची कन्या दिव्या व अरुण जाचक यांचे चिरंजीव भूषण जाचक यांच्या शुभविवाह प्रसंगी (सोमवार दि.२६ जून 2023) उपस्तीत असणाऱ्या प्रत्येकास विविध जातीचे रोपटे देण्यात आली व पर्यावरण वाचवा व पर्यावरण वाढवा या साठी वृषरोपण करा या कामी फडतरे व जाचक परिवार सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी बारामती ऍग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार, छत्रपती कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, माळेगाव कारखान्याचे मा चेअरमन चंद्रराव तावरे, रंजन तावरे,साखर महासंघाचे मा अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व इंदापूर व बारामती तालुक्यातील पदाधिकारी व नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
निसर्गाचा असमतोल होत असताना शुभविवाह प्रसंगी सर्व मंडळींना पर्यावरण चा अचूक संदेश या निमित्ताने दिला जातो त्यासाठी सुरुवात आमच्या विवाह पासून केल्याचे नववधू व वर दिव्या व भूषण यांनी सांगितले .
विवाह प्रसंगी शॉल, श्रीफळ, हार, बुके, फेटा आदी वर जास्त खर्च होतो तो टाळून रोपटे खरेदी करून वृषरोपण चा संदेश दिल्याचे आत्मिक समाधान लाभल्याचे किशोर फडतरे यांनी सांगितले.
वृषरोपण वर आधारित मंगलाष्टक नी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.”सर्व वधू वर यांनी प्रत्येक लग्नात वृक्षारोपण साठी पुढाकार घ्यावा व हार, तुरे, यांना फाटा द्यावा व सदर विवाह आदर्शवत असल्याचे बारामती ऍग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितले .बहारदार, पर्यावरण विषयक सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.आभार रमेश देवकाते यांनी मानले.