दैनिक स्थैर्य | दि. २९ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सोमवार, दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी मुधोजी महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या वतीने ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान साजरे करण्यात आले. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम साजरे करून हे अभियान साजरे केले जात आहे. केंद्र शासनाने हा उपक्रम सुरू केला असून प्रत्येक गावातून हा मातीचा अमृत कलश देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचवून एकतेचा संदेश तरुणांमध्ये रुजवणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. हा उत्सव सुरू ठेवण्यासाठी महाविद्यालयात ‘मेरी माटी, मेरा देश अभियान’ सुरू केले आहे. हा अमृत कलश शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत दिल्लीपर्यंत पोहोचवला जाणार असून त्यासाठी दोन स्वयंसेवकांची निवड राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी केलेली आहे.
या कार्यक्रमावेळी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, निर्भया पथकाच्या भोसले मॅडम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी अॅड. डॉ. अशोक शिंदे व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. सोमनाथ लवांडे, माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. मदन पाडवी, सर्व सहकारी प्राध्यापक, तसेच सर्व एनएसएस सदस्य आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार एनएसएस विदयार्थिनी कु. तुळसा शिंदे हिने मानले.