
दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । फलटण । महाराष्ट्रात एसटीचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला असताना अन्य राज्यांतही परिवहन महामंडळांची परिस्थिती तशी बिकटच आहे. महामंडळाचे खाजगीकरण टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याचे धोरण राबवणे गरजेचे आहे. तरी सरकारने लवकरात लवकर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या मागणीला न्याय द्यावा, अशी मागणी सुरवडी विकास सोसायटीचे चेअरमन शांताराम मोहिते यांनी केलेली आहे.
एस. टी. महामंडळाच्या फलटण येथील कर्मचाऱ्यांना किराणा मालाचे किट्सचे वाटप शांताराम मोहिते यांच्यावतीने करण्यात आले. त्यावेळी मोहिते बोलत होते. यावेळी सागर मोहिते, संदीप मोहिते, सुखदेव अहिवळे, ज्ञानेश्वर कदम, संजय कदम, श्रीपाल जैन, हणमंत जाधव, केदार जखारे, दादासो काळे, संजय जंगम, ओमिका कांबळे, गणेश सावंत, गणेश जगताप, प्रसाद मोहिते यांच्यासह कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.