
दैनिक स्थैर्य | दि. 10 फेब्रुवारी 2023 | फलटण | मी आणलेल्या पाण्यावर तुमचे कारखाने सुरू आहेत; तर तुम्ही आणलेल्या पाण्यावर आता मी पूर्वी दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. आता जे देशामध्ये सर्व खासदार आहेत; त्या खासदारांमध्ये आपल्या खासदारांना “हिंदुत्व” हा शब्द सुद्धा लिहता येणार नाही. आपले जे खासदारांचे शिक्षण झाले आहे; ते स्टो व मिक्सर दुरुस्त करण्याचे शिक्षण झाले आहे. त्यांच्या सोबत माझी कसलीही तुलना होणार नाही, असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवीवर्षानिमित्त फलटण तालुक्यातील गोखळी येथे ग्रामपंचायत कार्यालय व पिण्याच्या टाकीचा उद्घाटन समारंभ हा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते गोखळी ग्रामपंचायतीच्या पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले (भैय्या), श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, श्रीराम सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन महादेव पवार (आबा), फलटण पूर्व भागाचे जेष्ठ नेते विश्वास गावडे, राजन फराटे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. उषा गावडे, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय कापसे, बापूराव जगताप, तालुका दूध संघाचे सभापती धनंजय पवार, गोखळीच्या सरपंच सौ. सुमन गावडे (सवई), उपसरपंच सागर गावडे (पाटील), गोखळीचे तंटामुक्त अध्यक्ष मनोज गावडे (सवई) यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पूर्व भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांगली मुले आता राजकारणामध्ये येणे गरजेचे
यापूर्वी सुद्धा तालुक्यात राजकारण होत होत. याआधी सुद्धा तालुक्यात आमदार होत होते. पंचायत समिती सदस्य होत होते. जिल्हा परिषद सदस्य होत होते. आपण तालुक्यामध्ये ज्या कारणासाठी आपण आलो आहे. तेच करण महत्वाचे आहे. आगामी काळामध्ये चांगली पिढी आली पाहिजे. फलटण तालुक्यात उभारलेले विकासकामांचा डोंगर हा असल्या थापाड्या माणसाकडे द्यायचा ? नीरा – देवधरचे पाणी जर अडवले नसते तर दुसऱ्या राज्यात गेले असते. ह्या सगळ्या गोष्टी असताना आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये चांगली मुले आता राजकारणामध्ये येणे गरजेचे आहे. जर पुढची चांगली पिढी पुढे आली नाही; तर विचार करणे गरजेचे आहे. कोणीही कितीही आले तरी जनता माझ्यासोबत आहे तो पर्यंत असले मी खिशात घालून फिरणार आहे. ज्यावेळी हे मंत्री व इतर माणसे येत आहेत; याचा अर्थ निवडणूक जवळ आली आहे, असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
स्वराज कारखान्याला स्वतःहून कोणीही ऊस घालत नाही
स्वराज कारखान्यावर तालुक्यातील कोणताही शेतकरी स्वतःहून ऊस घालणार नाही. नीरा – देवधरला जे सुधारित प्रशासकीय मान्यता आणली आहे. आणि हे खासदार सांगत आहेत की बजेटमध्ये या नीरा – देवधरला तीन हजार 900 कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली आहे. वास्तविक हे काम नक्की कोणी केले आहे; ते बघणे गरजचे आहे, असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
ऊसाप्रमाणे कापसावर प्रक्रिया करणारे कारखाने उभारणे गरजेचे
फलटण तालुक्यामध्ये आता कापसाचे पीक वाढत आहे. पूर्वी प्रमाणे जर कापसाची लागवड झाली; तरी यावर आता ऊसाप्रमाणे कापसावर प्रक्रिया करणारे म्हणजेच कापड किंवा अंतिम प्रोडक्ट असणारे कारखाने तालुक्यात उभारणे गरजेचे आहे. अश्या प्रकारचा प्रयोग आपण करणे गरजेचे आहे. यामध्ये जरा धोका आहे. परंतु हा धोका पत्करून कापसावर असणारे रोग व त्यामध्ये होणारे संशोधन आता पूर्वीपेक्षा मोठे आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ऊसाप्रमाणे कापसावर प्रक्रिया करणारे कारखाने उभारणे गरजेचे आहे, असे मत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
कापसामध्ये चार महिन्यात ऊसाएवढे पैसे मिळतील
सध्या पूर्व भागामध्ये ऊसाचे गणित मांडले जाते. तरी हे गणिते बाजूला ठेवून आता कापूस पिकाकडे वळणे गरजेचे आहे. कापूस पिकामध्ये ऊसाएवढे पैसे मिळणे शक्य आहे. तरी आगामी काळामध्ये ऊसा पेक्षा कापूस पीक घेणे गरजेचे आहे. यामध्ये कापूस पीक आगामी काळामध्ये नक्कीच ऊस या पिकापेक्षा ऊसापेक्षा जास्त किंवा ऊसाएवढे पैसे मिळतील, असे मत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
ऊसाला पांढरे सोनेच म्हणजेच कापुसच विश्रांती देईल
फलटण तालुक्यामध्ये आता कापसाचे पीक पुन्हा एकदा वाढण्यास सुरवात झाली आहे. फलटण तालुक्यातून कापूस गेला कसा हे सुद्धा कळलं नाही; त्यामध्ये एक पिढी गेली आहे. कापसाचे पीक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजेत. ऊसाच्या पिकाला विश्रांती देण्यासाठी कापूस हे पीक घेणे गरजेचे आहे. कापूस म्हणजे पांढरे सोन आहे; आणि हेच सोन आपल्या जमिनीला विश्रांती देईल, हेच सांगणे गरजेचे आहे, असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात काही गोष्टी मुद्दामून चुकीच्या पसरवल्या जातात
फलटण तालुक्यामध्ये विकासाची साखळी उभा करण्याचे काम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुरू आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात काम करत असल्याने फलटण तालुक्याचा विकासरथ सुरू आहे. फलटण तालुक्यात काही गोष्टी मुद्दामून चुकीच्या पसरवल्या जातात. नीरा देवधर असो किंवा धोम बलकवडी धरण आहे; याचे काम फक्त आणि फक्त श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळेच पूर्ण झाले आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जो पाणी वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता; त्यामुळे फलटण, बारामती व माळशिरस या तालुक्यांना फायदा होत आहे. आगामी काळामध्ये नीरा – देवधर धरण हे पूर्ण करण्याचे काम हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पूर्ण होईल, असा विश्वास आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
आयत्या पिठावर रेघोट्या मारकण्याचे काम सध्या तालुक्यात सुरू आहे
फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणण्याचे काम केले. आता जरा सत्ता बदल झाल्यानंतर आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सुरू आहे. आता लगेच पत्र देऊन कोणतेही कामे मार्गी लागत नाहीत; फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे काम श्रीमंत रामराजे यांनी केले आहेत, असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
ऊस तोडणी आता मशीनद्वारेच करावी लागणार
आता फलटण तालुक्यामध्ये ऊस तोडणी मजुरांचे मोठे प्रश्न निर्माण झाले .आहेत ऊस तोडणीसाठी असणाऱ्या टोळ्यांचा मोठा प्रश्न सध्या उदभवले आहेत. आता आगामी काळामध्ये जर आपल्याला ऊस तोडणी कामगार व टोळ्यांचा प्रश्न निकाली काढायचा असेल तर आपल्याला ऊस तोडणी ही मशीनद्वारेच करावी लागणार आहे, असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
नीरा – देवधर प्रकल्पाचे श्रेय हे श्रीमंत रामराजेंचेच
नीरा – देवधर धरणावर आता सगळे बोलत आहेत. परंतु नीरा – देवधरचे पाणी फलटण तालुक्यात आणण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झाले आहे. नीरा – देवधरचे पाणी आपल्याला राहण्यासाठी श्रीमंत रामराजे हे अपक्ष आमदार असताना विशेष प्रयन्त केले आहेत. त्यांनी जर त्यावेळी हे प्रयत्न केले नसते आज तालुक्यात सुरू झालेले साखर कारखाने दिसले नसते. तालुक्यामध्ये जे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे; ते फक्त धोम – बलकवडी व नीरा – देवधर यांच्या आलेल्या पाण्यामुळेच आणि हे पाणी फलटण तालुक्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी फक्त आणि फक्त श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळेच पाणी आले आहे, असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
ऊसासाठी झोन पद्धत बंद करण्यासाठी श्रीमंत रामराजेंनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा उभारला
फलटण तालुक्यात कापसाचे पुनर्जीवन करण्याचे काम ज्या ठिकाणाहून होत आहे. त्या गोखळी या ठिकाणी आज कापूस उत्पादक शेतकरी मेळावा होत आहे; ही मोठी गोष्ट आहे. गोखळीसह या पंचक्रोशीमध्ये आल्यानंतर कापसासोबत ऊसावर बोलणे सुद्धा गरजेचे आहे. आपल्या तालुक्यात ऊस कारखानदारी कशी बिघडत गेली; हे तालुक्याला माहीत आहे. पूर्वीच्या काळामध्ये ऊस कारखान्यात घालण्यासाठी झोन पद्धत होती; ती झोन पद्धत बंद करण्यासाठी श्रीमंत रामराजे यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा उभा करून झोन पद्धत बंद केली; हे आताच्या तरुणांना माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळेच आता ऊस दराची चढाओढ सुरू असते. कारखाना ज्या वेळी आवसायनामध्ये काढायची वेळ आली होती त्यावेळी आम्हाला सुद्धा पुन्हा एवढ्या जोमाने कारखाना सुरू होईल याची माहिती नव्हती, असे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना रामराजे त्रास देत नाहीत तर गटातील कार्यकर्त्यांना कधी देणार
फलटणच्या पूर्व भागामध्ये जो आता कापूस मोठ्या भागामध्ये लागत आहे. त्यासाठी आता ह्या भागामध्ये कापूस खरेदी केंद्र किंवा जिनिंग सुरू करणे गरजेचे आहे; तालुक्यामधील पाणी आणल्यावर व आता बंद असलेले कारखाने सुरू केल्यावर आता कापूस खरेदीसाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. मनोज गावडे यांनी जो उल्लेख केला की, राजे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला त्रास होईल तर आमचा श्रीमंत रामराजेंच्यावर असा आरोप आहे की, जे आपले विरोधक आहेत; त्यांना श्रीमंत रामराजे त्रास देत नाहीत. तर गटातल्या लोकांना कसे ते त्रास देतील ?. श्रीमंत रामराजे हे जेंव्हा पहिल्यांदा आमदार झाले होते तेंव्हा ते अपक्ष आमदार होते; तेंव्हा जर श्रीमंत रामराजेंनी कोणतेही मंत्री पद मागितले असते तर ते सहज मिळाले असते; परंतु त्यांनी सातारा जिल्हा व फलटण तालुक्यासाठी कृष्णा खोरे मागितले व त्याची फळे आताच्या पिढीसह पुढील पिढीला मिळणार आहेत. आज जे फलटणच्या पूर्व भागाला पाणी येत आहे; जर पाणी वाटप बदलले गेले तर आपली पाण्याची एक पाळी बंद होण्याची परिस्थिती आहे, अशी भीती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केली.
आमच्या घरामध्ये सरपंच पद आल्यानंतर गोखळी ग्रामपंचायत इमारतीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीसाठी पैसे कमी पडू दिले नाहीत. त्यासाठी मोठा पाठपुरावा करावा लागला. कोरोना व तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस इमारतीचा उदघाटन सोहळा लांबला होता. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात आज उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. गोखळी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही गावातील सर्वच एकत्र येऊन काम करत आहोत. त्यामुळे आज बदल दिसत आहे. राजे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी उशीर झाला चार वर्षांपूर्वी प्रवेश केला होता आता त्याआधीच प्रवेश करायला पाहिजे होता, असे मत गोखळीचे तंटामुक्त अध्यक्ष मनोज गावडे (सवई) यांनी स्पष्ट केले.
यावेळी गोखळी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीची पाहणी आमदार श्रीमंत रामराजे नाईक ,निंबाळकर आमदार दीपक चव्हाण यांच्यासह विविध मान्यवाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या बागेची पाहणी सुद्धा यावेळी करण्यात आली.