कोळकी ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश शिंदे भाजपात; कोळकीत दुसरा धक्का


दैनिक स्थैर्य | दि. २३ डिसेंबर २०२४ | फलटण | कोळकी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनी राजे गटाला रामराम करत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागत नसल्याने गणेश शिंदे यांनी राजे गटाला राम राम ठोकला आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रणजीत जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह उर्फ बबलू निंबाळकर, यशवंत जाधव, राजन खिलारे, गोरख जाधव, डॉ. प्रमोद अब्दागिरे, निरंजन निंबाळकर, ॲड. सुरज क्षीरसागर, योगेश शेलार, अंकुश शेलार यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!