मेलोराचे व्हॅलेंटाईन कलेक्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । मेलोरा या भारतातील झपाट्याने विकसित होणाऱ्या डी२सी ब्रॅण्डने जोडीदारासाठी परिपूर्ण गिफ्ट निवडण्यामध्ये मदत करण्यासाठी नवीन व्हॅलेंटाईन कलेक्शन सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये कपल बॅण्ड्स, तसेच फॅशनेबल अंगठ्या, पेंडण्ट्स, ब्रेसलेट्स व सोने, हिऱ्याचे कानातले आणि रत्नजडित आभूषणांचा समावेश आहे

महिलांकरिता १६,००० हून अधिक डिझाइन्ससह मेलोराकडे गिफ्टिंगसाठी परिपूर्ण असलेल्या किफायतशीर सूक्ष्म ज्वेलरी डिझाइन्सचे सर्वात मोठे कलेक्शन्स आहेत. मेलोराने नुकतेच मेन्स कलेक्शन देखील लॉन्च केले आहे. ही मोहिम प्रामुख्याने २५ ते ४० वर्षे वयोगटातील पुरूष व महिलांना लक्ष्य करते आणि ३००० रूपयांपासून सुरू होणारे दागिने देते. ब्रॅण्ड भारतभरातील २६,००० ठिकाणी आपली उत्पादने वितरित करतो, ज्यामुळे ब्रॅण्डने १०,००० कमी लोकसंख्या असलेल्या खेड्यापासून ते १० लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरांपर्यंत आपली छाप निर्माण केली आहे.

ब्रॅण्डने डिजिटल जाहिरात मोहिम पार्टनरइनसक्सेस देखील लॉन्च केली आहे, ज्यामधून संदेश दिला जात आहे की गिफ्टिंग हा फक्‍त एक मार्गी नाही, म्हणजेच फक्त एकानेच दिला पाहिजे असे नाही आणि महिला देखील विचारशील गिफ्ट्ससह आपल्या जोडीदाराला अचंबित करू शकतात.

मेलोराच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सरोजा येरामिल्ली म्हणाल्या, ‘‘मेलोरामध्ये आम्हाला माहित आहे की, नाते सर्वसमावेशक होत आहे आणि साहचर्य व पाठिंबा नात्याला परिभाषित करतात. आमची नवीन डिजिटल मोहिम पार्टनरइनसक्सेससह नाते हे एकमेकांचा पाठिंबा व विश्वासाबाबत असते आणि गिफ्टिंग फक्त एक-मार्गी नाही या संदेशाचा प्रसार करण्याची आमची इच्छा आहे. महिला देखील गिफ्ट्स देत आपल्या जोडीदाराप्रती त्यांची आपुलकी व्यक्त करू शकतात. म्हणून, सर्व ग्राहक सर्वात किफायतशीर किंमतीपासून सुरू होणाऱ्या आमच्या व्यापक कलेक्शन्समधून निवड करू शकतात.’’


Back to top button
Don`t copy text!