स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेळघाटचा वीर सुपुत्र अनंतात विलीन

हजारो लोकांच्या उपस्थितीत शहीद कैलास दहिकर यांना भावपूर्ण निरोप

Team Sthairya by Team Sthairya
December 27, 2020
in उर्वरित महाराष्ट्र
मेळघाटचा वीर सुपुत्र अनंतात विलीन
ADVERTISEMENT


स्थैर्य, अमरावती, दि. २७ : हिमाचलात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कैलास दहिकर यांना आज हजारो लोकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे  व जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी शहीद दहिकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस दलातर्फे तीन फैरी झाडून शहिद दहिकर यांना सलामी देण्यात आली.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर, जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांनी पुष्पचक्र वाहून शहीद कैलास दहिकर यांना श्रद्धांजली वाहिली.

अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकर हे कुलू मनाली क्षेत्रात कर्तव्यावर हजर होते. रात्री रॉकेल हिटरमुळे टेंटला आग लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शिमला- चंदीगड येथून दिल्ली व दिल्लीहून विमानाने नागपूर येथे व नागपूराहून सैनिकांच्या दलासह पिंपळखुटा येथे आणण्यात आले. शहीद दहिकर यांना वंदन करण्यासाठी पिंपळखुटा गावासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. अचलपूर व परिसरातील गावांतून नागरिक रस्त्याच्या दुतर्फा भारतमातेच्या या सुपुत्राला वंदन करण्यासाठी उपस्थित होते. ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले होते. ‘भारतमाता की जय’, ‘शहीद कैलास दहिकर अमर रहे’ अशा घोषणा देत पिंपळखुटा येथे हजारो नागरिक जमले होते.

सैन्यदलाच्या वाहनात शहीद दहिकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यावेळी कुटुंबीय व आप्त यांचा शोक अनावर झाला होता. त्यानंतर अग्निविधीसाठी गावालगत तयार करण्यात आलेल्या मैदानावर पार्थिव आणण्यात आले. सैन्यदल व पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. शहीद दहिकर यांच्या वीरपत्नी बबलीताई कैलास दहिकर यांना सैन्यदलातर्फे सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला. शहीद दहिकर यांचे बंधू केवल यांनी दहिकर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले.

भूमीचा गौरव वाढवणारा वीर – पालकमंत्री ॲड.ठाकूर

शहीद कैलास दहिकर यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या सुपुत्राने येथील भूमीचा गौरव वाढवला आहे. दहिकर परिवाराची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे. आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी सहाय्य करू, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

सातपुड्याच्या कुशीत वाढलेला मेळघाटच्या शूर सुपुत्राला हिमालयाच्या कुशीत वीरमरण आले. शहीद कैलास दहिकर यांचा त्याग व बलिदान सर्वांना प्रेरणा देणारे आहे, अशी भावना राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केली. खासदार श्रीमती राणा, सरपंच गजानन येवले आदींनीही यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

बांधकाम क्षेत्राच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचे चांगभले राज्याचे हजारो कोटींचे नुकसान, निर्णय तत्काळ स्थगित करा! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post

गडचिरोलीमधील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार सेंट्रल किचनद्वारे जेवण

Next Post
गडचिरोलीमधील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार सेंट्रल किचनद्वारे जेवण

गडचिरोलीमधील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार सेंट्रल किचनद्वारे जेवण

ताज्या बातम्या

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

January 17, 2021
स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

January 17, 2021
”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा”- बाळासाहेब थोरात

”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा”- बाळासाहेब थोरात

January 17, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

संशयितांचे 72 अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

January 17, 2021
हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

January 17, 2021
Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

January 17, 2021
फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

January 17, 2021
राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

January 17, 2021
तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज

January 17, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

ओंकार चव्हाण खून प्रकरणी अणखी तिघे जेरबंद

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.