दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा पालिकेच्या चाळीस नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत अधिकृत रित्या शनिवारी संपत आहे . परिणामी आज सातारा पालिकेत अगदीच निरोप समारंभाचा माहौल होता . प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी दुपारी नगराध्यक्ष माधवी कदम यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला .
शुक्रवारी सकाळच्या सत्रात सत्ताधारी सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडी यांच्या नगरसेवकांची लगबग सुरु होती . पाच वर्षापूर्वी 22 डिसेंबर 2021 रोजी माधवी कदम यांनी नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली होती . आणि 27 डिसेंबरपासून पालिकेच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली होती . त्या हिशोबाने सत्ताधारी सातारा विकास आघाडीची मुदत 27 डिसेंबर 2021रोजी संपत आहे . मात्र त्या दिवशी रविवार ची आठवडा सुट्टी आल्याने शुक्रवारीच पालिकेत नगरसेवकांना निरोप देण्याचा भाव पूर्ण माहौल होता . उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सकाळीच पालिकेत येऊन नेहमीप्रमाणे प्रलंबित कामांचा आढावा घेतला . तर नगराध्यक्ष माधवी कदम या सुद्धा सकाळपासूनच दालनात उपलब्ध होत्या . काही प्रलंबित प्रकरणावर स्वाक्षऱ्या इतर गाठीभेठींचे त्यांचे सत्र सुरुच होते . विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी नगराध्यक्षां ची गाठ घेऊन गेले पाच वर्ष जे सहकार्य मिळाले त्याबद्दल आभार मानले . दुपारी दीड वाजता लेखा विभाग ‘ , बांधकाम विभाग , पाणीपुरवठा व वसुली विभागाच्या कर्मचार्यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांची गाठ घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . प्रशासनाच्या उत्तम सहकार्याबद्दल नगराध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले . मुख्याधिकारी अभिजीत बापट , लेखाधिकारी आरती नांगरे , मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील , अर्तगत लेखापरिक्षक कल्याणी भाटकर , शैलेश अष्टेकर , अमोल लाड , नगरसेविका स्नेहा नलावडे यावेळी उपस्थित होते . मुख्याधिकारी बापट यांनी नगराध्यक्ष माधवी कदम यांना पुष्पगुच्छ दिल्यावर नगराध्यक्ष दालनाने सौहार्दतेचा सुखद अनुभव घेतला . गेल्या पाच वर्षात अनेक कडू गोड आठवणींनी अनुभव वारसा समृद्ध झाला आहे . प्रशासनातील हे अनुभव मला व्यक्तिगत आयुष्यातही मला सातत्याने उपयोगी पडतील . खासदार उदयनराजे भोसले यांचे खंबीर मार्गदर्शन सातारकरांचा विश्वास आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळेच नगराध्यक्ष या पदावरून मला शाहूनगरीची पर्यायाने सातारकरांची सेवा करायला मिळाली हे माझे सौभाग्य असल्याची भाव पूर्ण प्रतिक्रिया माधवी कदम यांनी दिली . सायंकाळ च्या सत्रात पालिका प्रशासनाने सभापती दालनांना संकेता प्रमाणे कुलूपबंद केले . सोमवार पासून पालिकेवर प्रशासक नेमला जाणार आपल्याची चिन्हे आहेत . त्यामुळे येथे कोणाची वर्णी लागणार याची प्रशासनाला प्रतिक्षा आहे.